Talegaon Dabhade : मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी सुनील भोंगाडे

307

एमपीसी न्यूज- मावळ विधानसभा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदी माळवाडी येथील कार्यकर्ते सुनील उर्फ नाना भोंगाडे यांची एकमताने जाहीर निवड करण्यात आली. पुणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रदीप गारटकर यांनी भोंगाडे यांना पुणे येथील पक्षकार्यालयात नियुक्तीपत्र दिले.

HB_POST_INPOST_R_A

यावेळी मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष बबनराव भेगडे, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक अध्यक्ष सचिन घोटकुले, नगरसेवक संतोष भेगडे, तळेगांव राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष आशिष खांडगे, मावळ तालुका विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष नवनाथ चोपडे आदि उपस्थित होते.

यावेळी भोंगाडे एमपीसी न्यूजच्या प्रतिनिधींशी बोलताना म्हणाले, ” मी मावळ तालुक्यात वेळोवेळी पक्षाचा निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करत आलो आहे आणि येथून पुढे देखील करत राहीन. मावळ तालुक्यातील विकासाच्या दृष्टीने वंचित राहिलेल्या भागात विकासकामे करण्याचा आमचा प्रयत्न राहील. तसेच मागील काही महिन्यांचा आढावा घेतला असता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे युवकवर्ग आकर्षित होत आहे. पक्षाने माझ्यावर टाकलेल्या जबादारीचे मी सोने करून शेवटपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता म्हणून काम करेन” तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामधील गटबाजी संपलेली असून विधानसभा निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या झेंड्याखाली येईल यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत असेही ते म्हणाले.

सुनील भोंगाडे हे गेली अनेक वर्षे तालुक्याच्या राजकारणात सक्रीय आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ते स्थापनेपासून क्रियाशील सदस्य आहेत. रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे माजी अध्यक्ष असून, उत्तम संघटक म्हणून ते ओळखले जातात. यापूर्वी त्यांनी पक्षाच्या जिल्हा युवक सरचिटणीसपदाची धुरा यशस्वीपणे सांभाळली आहे.

HB_POST_END_FTR-A4
HB_POST_END_FTR-A1

%d bloggers like this: