Talegaon Dabhade : माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील दाभाडे बिनविरोध

एमपीसी न्यूज- मावळ तालुक्यातील माळवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुनील तानाजी दाभाडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
सरपंच चंद्रकांत दाभाडे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या जागी निवडणूक घेण्यात आली.

सुनील दाभाडे यांचा एकमेव अर्ज आल्याने निवडणूक निर्णय अधिकारी बजरंग मेकाले यांनी त्यांच्या नावाची घोषणा केली. सहाय्यक म्हणून ग्रामसेवक के पी खेसे यांनी काम पाहिले. यावेळी उपसरपंच कुमार आल्हाट, पूनम आल्हाट, माजी सरपंच गणेश दाभाडे, वैशाली शेलार, रजनी दाभाडे, माजी सरपंच बाळासाहेब आल्हाट, जयश्री गोठे, राजश्री तळपे, मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस बजरंग जाधव, माजी सरपंच सोपान दाभाडे, गोरख तात्या दाभाडे, काशिनाथ भोंडवे , निवृत्त विस्तार अधिकारी दत्तात्रय दाभाडे, पोलीस पाटील रवींद्र दाभाडे, बबनराव मराठे, अशोक दाभाडे, ज्येष्ठ नेते नामदेव शेलार, अनिल दाभाडे व ग्रामस्थ आदि मान्यवर मोठया संख्येने उपस्थित होते.

सुनील दाभाडे हे मावळ तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून यशस्वी जबाबदारी सांभाळत आहेत. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून सत्कार करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

आगामी काळात बंदिस्त गटर, शुद्ध पाणी पुरवठा, आणि स्वच्छता व प्लास्टिक मुक्त ग्रामपंचायत यावर विशेष भर देण्यात येणार असल्याचे सुनील दाभाडे यांनी निवडीनंतर सांगितले.

HB_POST_END_FTR-A2
You might also like