Talegaon Dabhade : मावळातील मतदान परिवर्तनाच्या बाजूने – सुनील शेळके

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातून ही निवडणूक लढवताना मला मनापासून आनंद होत आहे. या जनतेचे ऋण फेडण्याचे मी जे काही काम केले त्यामुळे सकाळी 7 वाजल्यापासून मतदारांनी रांगा लावल्या आहेत. ही निवडणूक सुनील शेळके याची राहिली नसून ती मावळच्या जनतेनी हाती घेतली आहे. मतदार परिवर्तनाच्या बाजूने मतदान करीत आहेत, असा विश्वास मावळ विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस- काँग्रेस- एसआरपी- मित्र पक्ष महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांनी व्यक्त केला.

तळेगाव दाभाडे येथील थोर समाजसेवक नथुभाऊ भेगडे शाळेतील मतदान केंद्रावर सुनील शेळके व पत्नी सारिका शेळके यांनी मतदान केले. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

दहशत, दबाव याला बळी न पडता जानता ठामपणे माझ्या पाठीशी उभी आहे याचा विशेष आनंद आहे. लोक मनापासून मतदानाला बाहेर पडले आहेत. मावळातील मतदारांनी परिवर्तन घडवण्यासाठी भरभरून मतदान करावे, असे आवाहन शेळके यांनी केले.

भाजपच्या काही नेत्यांनी उमेदवारी देताना चूक केली, ती आता त्यांना डोळ्यांनी दिसत आहे. मी पक्षाला कधी नावं ठेवली नाही, भविष्यातही ठेवणार नाही. हॅटट्रिक व कॅबिनेट मंत्री पदाचा अट्टहास जनतेने मान्य केलेला नाही. या जनतेला विकास हवा आहे तसेच 24 तास उपलब्ध असणारा आमदार हवा आहे आणि त्यासाठीच मावळची जनता मतदान करत आहे, असे ते म्हणाले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.