Talegaon Dabhade : अतिवृष्टीमुळे सुनील शेळके यांचा गाव भेट दौरा तात्पुरता स्थगित

एमपीसी न्यूज- अतिवृष्टी आणि नागरिक व कार्यकर्त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुनील शेळके यांचा आजचा गाव भेट दौरा रद्द करण्यात आलेला आहे. गावात शेळके यांच्या भेटीला येणाऱ्या महिला, वयोवृद्ध नागरिक यांना त्रास होऊ नये आणि तालुक्याच्या सगळ्या भागातून उत्साहाने येणाऱ्या कार्यकर्त्यांना कोणत्याही प्रकारची अडचण येऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आलेला आहे.

मावळ भागात मुसळधार पाऊस सुरु असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. बऱ्याच ठिकाणी पूल पाण्याखाली गेलेत, गावांचा संपर्क तुटला आहे, काही ठिकाणी दक्षतेचा इशारा देण्यात आला असून धरणांमधून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नदीपात्रातील पाण्याच्या पातळीने धोक्याची रेषा केंव्हाच ओलांडली आहे. अशा परिस्थितीत दौरा करणे योग्य नसल्यामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. गाव भेट दौऱ्याच्या पुढील नियोजनाबाबत आज, रविवारी संध्याकाळी कळवण्यात येईल असे सांगण्यात आले असून सर्वानी आपली आणि आपल्या कुटुंबीयांची काळजी घावी, महत्वाचे काम असल्याशिवाय घराबाहेर पडू नये. असे आवाहन करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.