Talegaon Dabhade : अल्पसंख्याक समाज सुनील शेळके यांना मताधिक्य देणार- आफताब सय्यद

एमपीसी न्यूज- विधानसभा निवडणुकीमध्ये मावळ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना मावळ तालुक्यातील अल्पसंख्याक समाजाकडून मोठे मताधिक्य मिळवून देण्याचा निर्धार मावळ विधानसभा राष्ट्रवादी अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष आफताब सय्यद यांनी व्यक्त केला आहे.

मावळ तालुक्यातील अल्पसंख्याक समाज म्हणजे मुस्लिम, ख्रिचन, शीख व इतर संख्येने कमी असलेला समाज हा अल्पसंख्याक समाज नेहमी सरकारी सुविधांपासुन वंचित राहिलेला आहे. या समाजाकडे मागील पंचवीस वर्षे दुर्लक्ष झाले आहे. त्यामध्ये घरकुल योजना, शैक्षणिक शिष्यवृत्ती सुविधा, व्यवसायासाठी प्रोत्साहन व सहकार्य, समाज मंदिर, मस्जिद, दफनभूमीचे विषय, रस्ते, लाईट, पाणी, असे अनेक प्रलंबित प्रश्न आजही या समाजामध्ये आहेत. हे प्रश्न बाजूला ठेवून फक्त मतदानासाठी अल्पसंख्याक समाजाचा वापर केला जातो.

मावळात गेली पंचवीस वर्ष भाजपा सरकारची सत्ता असुन अल्पसंख्याक समाजासाठी काही ठोस भूमिका न घेतल्यामुळे या वेळेसच्या विधानसभेला आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना तालुक्यातुन अल्पसंख्याक समाजाकडून जास्तीत जास्त मताधिक्य देणार असल्याचे आफताब सय्यद यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.