Talegaon Dabhade : चांगले काम करणा-या ग्रामपंचायतींना स्पर्धा आयोजित करून बक्षीस देणार- सुनील शेळके

एमपीसी न्यूज- गावागावांत विकासाच्या माध्यमातून स्पर्धा आयोजित करून चांगले काम करणा-या ग्रामपंचायतींना बक्षीस देणार असून तालुक्याच्या विकासासाठी एकत्र या असे प्रतिपादन मावळचे आमदार सुनील शेळके यांनी व्यक्त केले. तळेगाव दाभाडे येथील हॉटेल एमराॅल्ड येथे शनिवारी (दि १६) रोजी आयोजित मावळ तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सर्व लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी यांच्याशी संवाद साधत असताना झालेल्या बैठकीत ते बोलत होते.

यावेळी तालुक्यातील 103 ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, नवनियुक्त प्रांताधिकारी संदेश शिर्के, तहसीलदार मधुसूदन बर्गे, गटविकास अधिकारी शरदचंद्र माळी, जि.प. सदस्या शोभाताई कदम, पंचायत समिती सदस्य साहेबराव कारके यासह पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी गटविकास अधिकारी माळी व प्रांताधिकारी संदेश शिर्के यांनी सर्व उपस्थितांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ गावाला मिळवून देण्याकरिता व त्यामार्फत गावचा विकास करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. तर आमदार सुनिल शेळके यांनी सर्व गावांच्या प्रमुख अडचणी लक्षात घेऊन लोकप्रतिनिधींनी त्या कामाचा पाठपुरावा करावा. यासंदर्भात आवाहन केले व स्वतः जातीने लक्ष घालून तालुक्यातील सर्व अडचणी सोडविणार असल्याचे सूतोवाच केले. तसेच प्रत्येक गावातील प्रमुख कामे शासनाच्या माध्यमातून मार्गी लावणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

यावेळी सरपंच परिषदेच्या वतीने दत्तात्रय पडवळ व पोलीस पाटील संघटनेच्या वतीने दत्तात्रय माळी यांनी विचार व्यक्त केले. सुदाम कदम यांनी आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like