Talegaon Dabhade : माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांनी स्वखर्चातून केले रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम

एमपीसी न्यूज- तळेगांव दाभाडे नगरपरिषदेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शंकरराव शेळके यांनी स्वखर्चामधून तळेगांव-चाकण रस्ता ते महावितरण कार्यालय ते स्नेहल सोसायटी या रस्त्यावर पडलेले खड्डे मुरूम टाकून बुजविण्याचे काम केले.

या रस्त्यावर पडलेल्या खड्डयांमुळे स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. नागरिकांचा त्रास कमी करण्यासाठी या रस्त्यावरील खड्डे तात्पुरत्या स्वरूपात मुरूम टाकून बुजवण्यात आले. या कामामुळे सोसायटी मधील नागरिकांनी आनंद व्यक्त करत सुनील शेळके यांचे आभार मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.