Talegaon Dabhade : आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा (डेमोक्रॅटिक) जाहीर पाठिंबा

एमपीसी न्यूज- रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक)चा राष्ट्रवादी काँग्रेस-काँग्रेस व मित्रपक्ष आघाडीचे उमेदवार सुनील शेळके यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (डेमोक्रॅटिक) पक्षाचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष तथा मावळ लोकसभा प्रभारी विनोद अशोक विधाटे यांनी उमेदवार सुनील शेळके यांना मावळ विधानसभा मतदारसंघात आपल्या पक्षाचा जाहीर पाठिंबा दिल्याचे पत्रक शेळके यांना दिले. यावेळी मावळ तालुका अध्यक्ष राहुल सोनवणे, पिंपरी-चिंचवड शहर युवक अध्यक्ष शंकर माने, पिंपरी-चिंचवड शहर उपाध्यक्ष सिद्धार्थ गायकवाड, महिला आघाडीच्या कार्यकर्त्यां अंजलीताई शिंदे, जनाबाई सोनवणे, मनीषा विधाटे उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.