Talegaon Dabhade : ढोल-ताशांच्या दणदणाटात सुनील शेळके यांच्या गाव भेट दौऱ्यास प्रारंभ

मिरवणुका आणि औक्षणाने गावागावात उत्स्फूर्त स्वागत

एमपीसी न्यूज – मावळ विधानसभा मतदारसंघातील भाजपच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार असलेले तळेगाव दाभाडेचे माजी उपनगराध्यक्ष सुनील शेळके यांच्या गावभेट दौऱ्याला शिरगाव येथे आज (शनिवार) मोठ्या उत्साहात प्रारंभ झाला. ढोल-ताशांचा दणदणाट मिरवणुका काढून तसेच सुवासिनींनी औक्षण करून पवन मावळातील विविध गावांमध्ये शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले.

सुनील शेळके यांनी गेल्या पाच वर्षांत मावळ तालुक्यात विविध कार्यक्रम आणि विकासकामांच्या माध्यमातून गावोगाव संपर्क वाढवत जोरदार मोर्चेबांधणी केली आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना त्यांनी भाजपचा झेंडा घेऊन गाव भेट दौरा सुरू केला आहे. जोरदार शक्तीप्रदर्शन करीत त्यांनी शिरगाव येथून या दौऱ्यास प्रारंभ केला. पहिल्या टप्प्यात तीन ते दहा ऑगस्ट दरम्यान शेळके हे पवन मावळातील प्रत्येक गावातील मतदारांशी पुन्हा संवाद साधणार आहेत. ग्रामदैवताचे दर्शन आणि ज्येष्ठांचा आशीर्वाद असे या गाव भेटीची स्वरूप आहे.

  • तळेगावचे नगरसेवक संदीप शेळके, माजी जिल्हा परिषद सदस्य गुलाबराव वरघडे, युवा सेनेचे पदाधिकारी अनिकेत घुले ,गहुंजेचे माडी उपसरपंच उमेश बोडके तसेच अमोल मोकाशी, सुरेश राक्षे, तुषार जगताप, अमोल राक्षे, यादव सोरटे, सूर्यकांत सोरटे, राकेश सोरटे, सोमनाथ वाघोले, राजेश वाघोले, शिवाजी गायकवाड, संतोष बांदल, अशोक बांदल, नारायण गायकवाड, मारुती बावकर, संदीप महाराज झांबरे, नथुराम महाराज भांबरे, अविनाश गराडे, संदीप सोरटे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने या दौऱ्यात सहभागी झाले होते.

पहिल्या दिवशी शिरगाव, गहुंजे, साळुंब्रे, गोडुंब्रे, सांगवडे, दारुंब्रे, चांदखेड, बेबेडओहोळ, धामणे, परंदवडी व सोमाटणे या गावांना शेळके यांनी भेट दिली व गामस्थांशी संवाद साधला. पाऊस असतानाही प्रत्येक गावात शेळके यांचे उत्स्फूर्त स्वागत करण्यात आले. शेळके यांनी गावातील प्रमुख ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांचे आशीर्वाद घेतले.

  • गाव भेट दौऱ्यात शेळके उद्या (रविवारी) कुसगाव, पाचाणे, पुसाणे, आढले खुर्द, आढले बुद्रुक, राजेवाडी, दिवड, ओवळे, डोणे, मळवंडी ढोरे, शिवणे व पिंपळखुटे या गावांमधील ग्रामस्थांशी संवाद साधणार आहेत.

 

 

 

 

 

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.