Talegaon Dabhade : सुरेश धोत्रे यांची राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सांस्कृतिक विभागाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अखिल भारतीय मराठी नाट्यपरिषद तळेगाव दाभाडे शाखेचे संस्थापक अध्यक्ष सुरेश धोत्रे यांची महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी चित्रपट, साहित्य, कला व सांस्कृतिक विभागाच्या महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी नुकतीच नियुक्ती करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे, प्रवक्ते अंकुश काकडे, आमदार चेतन तुपे यांच्या हस्ते धोत्रे यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

या विभागाच्या माध्यमातून चित्रपट, कला, साहित्य क्षेत्रातील समस्या सोडविणे आणि पक्षाची ध्येयधोरणे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सुरेश धोत्रे यांनी सांगितले.

सुरेश धोत्रे हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती संघटना मुंबई नियामक मंडळाचे सदस्य व ‘मी वडार महाराष्ट्राचा’ संस्थेचे प्रांतिक कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.