Talegaon Dabhade : गुरुवारपासून तळेगावात रंगणार स्वामी विवेकानंद व्याख्यानमाला

एमपीसी न्यूज- श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ, तळेगाव दाभाडे, समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठान तळेगाव दाभाडे व रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने गुरुवारी (दि. 13) पासून तीन दिवसीय स्वामी विवेकानंद व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. या व्याख्यानमालेमध्ये राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज आणि शिवपुत्र संभाजी महाराज यांच्या कार्यरूपी प्रेरणेची शलाका चमकावी व त्या अनुषंगाने आजचा तरुण प्रभावित व्हावा. त्याला आपले ध्येय, निश्चित करण्यासाठी उर्जा मिळावी या व्याख्यानमालेचे आयोजन केलेले आहे. त्याचबरोबर अशा तीन प्रमुख ऐतिहासिक व्यक्तिमत्वाच्या जीवनकार्याची ओळख मावळवासीयांना करून दिली जाणार आहे. व्याख्यानमालेचे हे तिसरे वर्ष आहे.

या व्याख्यानमालेचे पहिले पुष्प गुरूवार (दि.13 फेब्रुवारी) रोजी पिंपरी चिंचवड येथील काँनक्वेस्ट महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा प्रदीप कदम गुंफणार असून राजमाता जिजाऊ या विषयावर ते मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे नगरसेवक निखिल भगत उपस्थित राहणार आहेत.

या व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प शुक्रवार (दि 14 फेब्रुवारी) छत्रपती शिवाजी महाराज या विषयावर ज्येष्ठ इतिहास संशोधक, शिवचरित्र व्याख्याते पांडुरंग बलकवडे आपले विचार व्यक्त करणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नियोजन आणि विकास समितीच्या सभापती शोभाताई भेगडे उपस्थित राहणार आहेत.

या व्याख्यानमालेचे तिसरे आणि अखेरचे पुष्प शनिवार (दि 15 फेब्रुवारी) रोजी इतिहास संशोधक, प्रा. डाॅ प्रमोद बोराडे हे छत्रपती संभाजी महाराज या विषयावर आपले विचार मांडणार असून प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नवनिर्वाचित उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे उपस्थित राहणार आहेत.

ही व्याख्यानमाला दररोज संध्याकाळी चार वाजता मावळ भूषण मामासाहेब खांडगे सभागृह, स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल, हिंदमाता भूयारी मार्ग शेजारी तळेगाव दाभाडे येथे होणार आहे. या व्याख्यानमालेचा लाभ घेऊन राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज यांचे समाजकार्य व इतिहास जाणून घ्या असे आवाहन रोटरी क्लब ऑफ तळेगाव एमआयडीसीचे तसेच समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष संतोष खांडगे यांनी केले आहे.

या व्याख्यानमालेच्या संयोजनासाठी समाजप्रेमी आप्पा प्रतिष्ठानचे कैलास काळे (उपाध्यक्ष), रजनीगंधा खांडगे (सचिव), लक्ष्मण मखर (प्रकल्प प्रमुख),
श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष दादासाहेब उ-हे, सचिव मिलिंद शेलार, प्रकल्प प्रमुख बाळासाहेब शिंदे, तसेच रोटरी क्लब आॅफ तळेगाव एमआयडीसीचे अध्यक्ष गणेश काकडे, सचिव दशरथ जांभुळकर, प्रकल्प प्रमुख सचिन कोळवणकर यांच्यासह सर्व पदाधिका-यांनी पुढाकार घेतला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.