Talegaon dabhade : स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलचा निकाल 100 टक्के, सहा वर्षांची परंपरा कायम

विद्यालयातून एकूण 38 विद्यार्थी मार्च 2020 च्या दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झाले होते.

एमपीसी न्यूज – श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूल च्या दहावीचा निकाल 100 टक्के लागला असून विद्यालयाने मागील सहा वर्षांची परंपरा कायम राखली आहे.

विद्यालयातून एकूण 38 विद्यार्थी मार्च 2020 च्या दहावीच्या परीक्षेत प्रविष्ट झाले होते. त्यापैकी सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून 21 विद्यार्थी विशेष प्रावीण्यासह, अकरा विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण व द्वितीय श्रेणी मध्ये सहा विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.

विद्यालयात निशा शिवाजी मराठे हिने 90.60 टक्के मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे. संस्कृती सतीश देशमुख हिने 87.80 टक्के गुणांसह द्वितीय क्रमांक व अक्षय पाडुरंग गुंडाळ याने 86.20 टक्के  तृतीय क्रमांक मिळवला .

संस्थेचे अध्यक्ष  संतोष दत्तात्रय खांडगे, सचिव मिलिंद शेलार, शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे शिक्षकांचे अभिनंदन केले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.