Talegaon Dabhade : तळेगाव चाकण रस्त्यावरील खड्डा बनला आहे मृत्यूचा सापळा

एमपीसी न्यूज- तळेगाव- चाकण- शिक्रापूर या राष्ट्रीय महामार्गावर वडगाव फाट्याजवळ मुख्य रस्त्याच्या साईड पट्टीवर पडलेल्या मोठ्या खड्यामुळे अपघात होण्याची दाट शक्यता असल्याने परिसरातील नागरिक या खड्याच्या दुरुस्तीची वाट पाहत आहेत.

चाकण तळेगाव हा रस्ता वाहतुकीचे दृष्टीने अत्यंत अरुंद असून या रस्त्यावर अनेकदा मोठमोठे अपघात झाले आहेत. यामध्ये अनेकांना आपले जीव गमवावे लागले आहेत. हा रस्ता राज्यमार्ग होता. त्याचे रुंदीकरण त्वरित व्हावे म्हणून केंद्राकडून या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग घोषित केल. या रुंदीकरणास येणा-या खर्चाला देखील मंजुरी मिळाली.

अनेकदा या रस्त्याची मोजणी देखील झाली. याबाबत अनेकदा दैनिकात बातम्या देखील आल्या. आत्ता होईल होईल म्हणताना अनेक वर्ष या रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम रखडले. तळेगाव परिसरातून रस्ता रुंद व्हावा या दृष्टीने तळेगाव दाभाडे नगरपरिषद प्रशासनाने रस्त्यावर येणारी अतिक्रमणे तातडीने काढली.व रस्ता रुंद करण्यासाठी अनेकांची उपजीविकेची साधने देखील बंद केली.

या रस्त्याचे रुंदीकरण व्हावे, रस्त्यामधील जीवघेणे खड्डे त्वरित बुजावावेत. म्हणून अनेकदा नागरिकांनी प्रयत्न देखील केले. परंतु त्याची म्हणावी तशी दाखल या विभागाच्या प्रशासनाकडून घेतली गेली नाही. तळेगाव चाकण रस्त्यावरील वडगाव फाट्यावरील या मुख्य रस्त्याला बाजूला मोठा खड्डा पडला आहे. याठिकाणी लाईटची देखील व्यवस्था नाही. त्यामुळे रात्री प्रवास करताना या खड्याच्या खोलीची माहिती होत नाही. त्यामुळे अनेकदा लहान सहान अपघात होतात.यावर मोठे अपघात होऊन कोणत्या कुटुंबावर संकट येऊ नये. म्हणून हा खड्डा त्वरित बुजवावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.