Talegaon Dabhade : तळेगांव दाभाडे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनकडून सॅनिटायजर, मास्कचे वाटप

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील नगरपरिषदेच्या माध्यमातून कोरोनाच्या विरोधात देत असलेल्या लढ्यात आपलाही खारीचा वाटा असावा, या भावनेतून तळेगांव दाभाडे केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनच्या माध्यमातून मदत नसून कर्तव्य करत आहोत, असे असोसिएशनच्या पदाधिका-यांनी सांगितले. असोसिएशनकडून सॅनिटायजर, मास्कचे वाटप करण्यात आले.

पुणे जिल्हा व मावळ तालुका केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनच्या मार्गदर्शनाने तळेगाव दाभाडे केमिस्ट व ड्रगीस्ट असोसिएशनच्या वतीने चार बॉक्स सॅनिटायजर, 75 N 95 मास्क, व नगर परिषदेच्या OPD विभागाला लागणारा अतिरिक्त औषधी साठा देण्यात आला. असोसिएशनचे पदाधिकारी प्रदीप मुंगसे यांनी OPD विभागाला एक टेम्प्रेचर गन दिली.

याप्रसंगी मुख्याधिकारी दीपक झिंजाड, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, डॉ दिलीप भोगे, पुणे जिल्हा केमिस्ट अँड ड्रगीस्ट असोसिएशनचे अध्यक्ष सुरेशशेठ बाफना, तालुका अध्यक्ष गुलाब गदिया, सेक्रेटरी नेमीचंद गुंदेशा, शहर अध्यक्ष आशिष काणे, गाव अध्यक्ष श्री गौरंग मेहता, प्रमोद दाभाडे, संतोष शहा, प्रदीप मुंगसे, धर्मेश पटनी, कुमार गदिया व पदाधिकारी उपस्थित होते.

ग्रामीण विभागात मास्क वाटप व तळेगाव सारखाच लोणावळा, देहूरोड,कामशेत व वडगाव या ठिकाणच्या प्रशासनालाही आमचे सहकार्य राहील, असा मनोदय तालुका अध्यक्ष गुलाब गदिया यांनी व्यक्त केला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.