Talegaon Dabhade : देशांतर्गत सुरक्षेसाठी सरकारने वेळीच पावले टाकावीत – नितीन शास्त्री

एमपीसी न्यूज – देशांतर्गत सुरक्षा आणि देशद्रोहाबाबत सरकारने वेळीच कडक पावले टाकायला हवीत. अन्यथा या अतिरेकी कृतीचा त्रास सर्व सामान्य नागरीकापासून संरक्षण विभागाला भोगावा लागत आहे, असे मत नितीन शास्त्री यांनी व्यक्त केले.

तळेगावातील जागरुक नागरिकांकडून मराठा क्रांती चौक तळेगाव स्टेशन येथे जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथील बाँम्ब हल्ल्यात शहीद झालेल्या केंद्रीय राखीव दलाच्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी शास्त्री बोलत होते.

यावेळी येथील सीआरपीएफ केंद्राचे वरिष्ठ अधिकारी सचिन कुमकले,विनायक कारंडे, पोलिस उपनिरीक्षक सुरेश हगवणे,अनंत रावण,भीमराव मराठे,उदयोजक किशोर आवारे, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल,माहीती अधिकार कार्यकर्ते दिलीप डोळस,सुरेश शिंदे,जायंट्स ग्रुपचे अध्यक्ष तात्याराव कोळी, श्रीकांत पेशवे, राजेश बारणे आदींसह मान्यवर यावेळी उपस्थित होते.

यावेळी शास्त्री म्हणाले, असे अतिरेकी हल्ले हे दोन समाजात फुट पाडण्याचा प्रयत्न असू शकतो असे म्हणत भारतीय समाजाने संयम राखण्याचे आवाहन केले. देशांतर्गत सुरक्षा आणि देशद्रोहाबाबत सरकारने वेळीच कडक पावले उचलायला हवीत अशा भावना व्यक्त केल्या. जागरुक वाचक कट्टा,जायंट्स ग्रुपसह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि नागरीक मोठ्या संख्येने उपस्थीत होते.जायंट्स ग्रुपचे सदस्य अॅड.देविदास टिळे,संदीप गोंदवावे,तन्मय जमादार यांनी नियोजन केले होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.