Talegaon Dabhade: तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये कोरोना संशयितांसाठी ‘विलगीकरण’ कक्ष; मुख्याधिकारी, नगरसेवकांनी केली पाहणी

एमपीसी न्यूज – तळेगावदाभाडे नगरपरिषदेने कोरोना संशयितांसाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये विलगीकरण कक्ष स्थापन केला आहे. उपाययोजना तयार करण्यात आल्या असून मुख्याधिकारी दीपक झिंझाड, नगरसेवक निखिल भगत, रवींद्र आवारे यांनी आज (बुधवारी) या कक्षाची पाहणी केली.

पुणे शहर आणि पिंपरी-चिंचडमध्ये कोरोनाने शिरकाव केला आहे. या दोनही शहरात कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोनाचे दहा ‘पॉझिटीव्ह’ रुग्ण आढळले आहेत. तर, पुण्यात आठ बाधित रुग्ण आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून तळेगाव दाभाडे नगरपरिषदेने कोरोना संशयितांसाठी तळेगाव जनरल हॉस्पिटलमध्ये तसेच आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत. विलगीकरण कक्षही स्थापन केला आहे. या कक्षाची मुख्याधिकारी दीपक झिंझाड, नगरसेवक निखिल भगत, रवींद्र आवारे, डॉ. भोगे, डॉ. कामत यांनी पाहणी केली आहे.

कोरोनाचा रुग्ण आढळल्यास पुण्यातील नायडू रुग्णालयात पाठविण्यात येईल. नगरपरिषदेने देखील विलगीकरण कक्ष तयार केला आहे. कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी प्रशासनाने सज्ज रहावे. कोरोनाबाबत मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्याच्या सूचना रुग्णालय प्रशासनाकडून यावेळी देण्यात आल्या.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.