Talegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने पत्रकार दिन साजरा

एमपीसी न्यूज- दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांनी निर्भीड आणि रोखठोक मते मांडण्याच्या पत्रकारीतेचा पाया घातला असून आजही पत्रकारांनी त्याची परंपरा पुढे चालवावी. असे प्रतिपादन तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी केले. पत्रकार दिनानिमित्त तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे, नगरसेविका शोभा भेगडे, पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळूंज, उपाध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार, खजिनदार तात्यासाहेब धांडे, चेपे व ज्येष्ठ सल्लागार सुरेश साखवळकर, सोनाबा गोपाळे, बबनराव भसे आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.

दीपक झिंजाड म्हणाले, “गावाच्या विकासासाठी सकारात्मक दृष्टीकोन ठेवून चांगली भूमिका घेऊन पत्रकारिता केली तर निश्चितच सुधारणेला बळकटी येईल”

नगराध्यक्षा चित्राताई जगनाडे म्हणाल्या, “पत्रकारांनी आपल्या लेखणीचा सकारात्मक आणि विधायक पध्दतीने काम करण्यासाठी वापर करावा”असे आवाहन केले. ज्येष्ठ पत्रकार साखवळकर आणि गोपाळे यांनी जांभेकरांच्या कार्यपद्धतीचा आढावा आपल्या मनोगतामधून व्यक्त केला.

स्वागत मनोहर दाभाडे यांनी केले. सूत्रसंचालन अतुल पवार यांनी केले. तर आभार सुनील वाळूंज यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.