Talegaon Dabhade : मणक्यांचे आजार व उपचार शिबिराचा पाचशेहून अधिक रुग्णांनी घेतला लाभ

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील माईर्स एम.आय.टी संचलित एम.आय.एम.ई.आर. वैद्यकीय महाविद्यालय डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय, तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने मणक्याचे आजार निदान व उपचार शिबिराचे आयोजन केले होते. या मध्ये 500 हून अधिक रुग्णांनी या शिबिराचा लाभ घेतला.

_MPC_DIR_MPU_II

मावळ व परिसरातील नागरिकांसाठी मणक्याचे आजार निदान व उपचार शिबिराचे आयोजन गुरुवार दिनांक 28 फेब्रवारी व 1 मार्च  या दोन्ही दिवशी महाविद्यालयाच्या डॉ. भाऊसाहेब सरदेसाई तळेगाव ग्रामीण रुग्णालय तळेगाव दाभाडे येथे झाले. या शिबिरामध्ये महाविद्यालयाचे अस्थिरोग विभागाचे प्रमुख डॉ. प्रशांत कामत, डॉ.. दर्पण महेशगौरी, डॉ तुषार देवरे, डॉ संतोष बोरकर, डॉ स्वप्नील भिसे तसेच इतर वरिष्ठ डॉक्टरांनी जवळपास 500 हून अधिक रुग्णांची तपासणी केली.

या शिबिरात तज्ञ डॉक्टरांचा सल्ला व तपासणी, हाडांची ठिसुळता तपासणी, मुबलक औषधोपचार, भौतिकोपचार मोफत देण्यात आले आणि पुढील उपचार अतिशय सवलतीच्या दरात उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या रुग्णांसाठी राहण्याचा खर्च मोफत असेल अशी माहिती महाविद्यालयाच्या विश्वस्त व कार्यकारी संचालिका डॉ. सुचित्रा नागरे तसेच प्राचार्य डॉ. राजेंद्र प्रसाद गुप्ता यांनी दिली.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

_MPC_POSTEND_MAT_1