Talegaon Dabhade : गाण्यांवर स्टंटबाजी करणा-या दुचाकीस्वार रोडरोमिओंवर तळेगाव पोलिसांची कारवाई

दंडात्मक कारवाई करून पालकांच्या समोर दिली समज

एमपीसी न्यूज- तळेगाव परिसरातील कॉलेज परिसरात रस्त्यावर फिरून स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकीस्वार तरुणांना पोलिसांनी पकडून त्यांना सज्जड डाँ दिला. तसेच त्यांच्याकडून दंड वसूल करून पालकांच्या समोर त्यांना समज दिली.

तळेगांव दाभाडे पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांच्या आदेशानुसार मंगळवारी (दि 24) सकाळी पोलीस उपनिरीक्षक बाजगिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने तळेगाव परिसरातील कॉलेजमध्ये तसेच रस्त्यावर चौकाचौकांमध्ये फिरणाऱ्या दुचाकीवरून फिरणाऱ्या रोडरोमिओवर कारवाई केली.

आदर्श विद्या मंदिर, बालविकास विद्यालय; तसेच इतर महाविद्यालयाच्या परिसरातील कारवाई दरम्यान टिक टॉक वरील ‘तुम तो पछताओगे’ या गाण्यावर दहा ते बारा दुचाकीस्वार स्टंट करताना आढळले. या दुचाकीस्वार रोडरोमिओंना पकडून थेट पोलीस ठाण्यात आणून प्रत्येकी दोन हजार ते तीन हजार रूपये दंडाची कारवाई करण्यात आली. तसेच त्यांच्या पालकांना बोलावून त्यांच्यासमोर त्यांना समज देण्यात आली.

तळेगाव परिसरातील कॉलेज परिसरात तसेच चौकाचौकात दंगा करणाऱ्या रोडरोमिओंवर यापुढे तीव्र कारवाई करण्यात येणार असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.