Talegaon Dabhade: तळेगाव पोलिसांचेही ‘सोशल डिस्टंसिंग’ला प्राधान्य

एमपीसी न्यूज – सर्व देशात लाॅकडाऊनची घोषणा करण्यात आली असली तरी जीवनावश्यक वस्तूंना यांच्यातून वगळण्यात आले आहे. तरीही भाजी मंडई व किराणा मालाच्या खरेदी साठी लोक सुरक्षेची काळजी न घेता मोठ्या प्रमाणात गर्दी करत आहेत. यावर शक्कल लढवून तळेगाव पोलिसांनी भाजी खरेदीसाठी सुरक्षित अंतरावर मोठे रखाने आखून लोकांना उभे राहण्याची सोय केली होती. त्याच धर्तीवर आता पोलिस ही सुरक्षित अंतरावर उभे राहून सोशल डिस्टंसिंगचे महत्त्व पटवून देताहेत.

लोकांनी जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी अनावश्यक गर्दी करू नये असे वारंवार आवाहन करून देखील लोक भाजी व किराणा खरेदी साठी गर्दी करताना दिसत आहेत. सोशल डिस्टंसिंग चे भान नागरिकांना व्हावे म्हणून तळेगाव पोलिसांनी आता सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलिस कर्मचारी ही सुरक्षित अंतरावर उभे राहून सोशल डिस्टंसिंग पालन करत आहेत.

भाजी खरेदीसाठी होणार्या गर्दीवर उपाय म्हणून सुरुवात करण्यात आलेला तळेगाव पॅटर्न आता औरंगाबाद, नांदेड शहरात देखील अवलंबला जातो आहे. एवढेच नव्हे तर खूप लोकांनी या पॅटर्नचे कौतुक करत शेअर केला जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.