Talegaon Dabhade : नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे 17 आदर्श शिक्षकांचा गौरव

एमपीसी न्यूज – शिक्षकदिनाचे ( 5 सप्टेंबर ) औचित्य साधून तळेगाव दाभाडे नगरपरिषद शिक्षण समितीतर्फे शहरातील 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपनगराध्यक्ष संग्राम काकडे हे होते, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपाचे पुणे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे तर प्रमुख मार्गदर्शक सुरेश साखवळकर होते. यावेळी तळेगावमधील 17 शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देण्यात आला. यावेळी नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, शिक्षण समितीच्या सभापती कल्पना भोपळे, प्रशासकीय अधिकारी संपत गावडे, नगरसेवक अरुण भेगडे, रवींद्र आवारे, सुरेश दाभाडे, नगरसेविका नीता काळोखे, शोभा भेगडे, प्राची हेंद्रे, हेमलता खळदे, मंगलाताई जाधव, काजल गटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती नारायण भेगडे व विनायक अभ्यंकर आदी मान्यवर उपस्थित होते.

उज्ज्वला संभाजी तांबोळी (न. प. प्राथमिक शाळा क्र. 1), सुजाता भाऊसाहेब भुसारी (न. प. प्राथमिक शाळा क्र. 2), अविनाश महादेव खुणे (न. प. प्राथमिक शाळा क्र. 3), सीमा केरबा पाटील (न. प. प्राथमिक शाळा क्र. 4), ताहेराबेगम जिलाणी मुल्ला (न. प. प्राथमिक शाळा क्र. 5), किसन खंडुजी केंगले (न. प. प्राथमिक शाळा क्र. 6), पल्लवी राहुल जगताप (पैसाफंड प्राथमिक शाळा), रेखा नथू गायकवाड (आदर्श प्राथमिक विद्या मंदिर), प्रवीणी शिवाजी ढवळे (सरस्वती माध्यमिक विद्यालय), रेवप्पा विष्णू शितोळे (नवीन समर्थ विद्यालय), प्रीती वैभव महाजन (कांतीलाल शहा विद्यालय), ज्योती मुकुंद सावंत (कृष्णराव भेगडे इंग्लिश मीडियम स्कूल), सागर श्याम केंजूर (डॉ. अण्णासाहेब चोबे हायस्कूल), अनघा अमित कुलकर्णी (जैन इंग्लिश स्कूल), केशव दत्तात्रय जाधव (इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय), स्वाती तानाजी पाटील (टकले वस्ती अंगणवाडी), अमोल पांडुरंग पाटील (न. प. प्राथमिक शाळा क्र. 6) या शिक्षकांना आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

यावेळी पुरस्कारविजेत्या शिक्षकांच्या वतीने विजया दांगट व अमोल पाटील या दोन शिक्षकांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक शिक्षण समितीच्या सभापती कल्पना भोपळे यांनी केले. शिक्षण मंडळ सदस्य सुरेश दाभाडे यांनी स्वागत केले आभार नीता काळोखे यांनी मानले

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.