Talegaon Dabhade : देविदास सावंत,मारुती केंजळे, हर्षवर्धन कदम यांचा गाडा ठरला घाटाचा राजा

तळेगावात बैलगाडा शर्यतीत 400 बैलगाडे सहभागी,ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज  यात्रेनिमित्त बैलगाडा शर्यतीचे आयोजन

एमपीसी न्यूज – तळेगावचे ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज यात्रेनिमित्त (Talegaon Dabhade) मंगळवार (दि.9 ) आणि बुधवारी (दि.10) बैलगाडा शर्यत घेण्यात आली. यामध्ये टोकन मधून 350 स्पर्धकांनी भाग घेतला. तर गावक-यांनी 50 गाड्यासह भाग घेतला. घाटाचा राजा म्हणून पहिल्या दिवशी देविदास सावंत, मारुती केंजळे यांनी 11.47  सेकंदामध्ये तर दुस-या दिवशी हर्षवर्धन सुभाष कदम यांनी 11.37  सेकंदामध्ये घाटाची बारी पूर्ण करून घाटाचा राजा म्हणून मान मिळविला.तर गावामधून सोमाभाऊ भेगडे यांचा गाडा 11.68  सेकंदामध्ये धावला असून त्याचा गावाच्या गाड्यामध्ये प्रथम क्रमांक आला.
या घाटात 12 सेकंदामध्ये 31 गाडे धावले त्यांना प्रत्येकी रोख 3 हजार 200 रुपये रोख बक्षीस दिले,13 सेकंदामध्ये 51 गाडे धावले त्यांना प्रत्येकी रोख 1 हजार 900 रुपये बक्षीस दिले. 14 सेकंदामध्ये 77  गाडे धावले त्यांना प्रत्येकी रोख 600 रुपये  बक्षीस दिले.15 सेकंदामध्ये 37 गाडे धावले त्यांना प्रत्येकी रोख 800रुपये बक्षीस दिले.
या घाटात फळीफोड अनुक्रमे पहिल्या व दुस-या दिवशी – 12 सेकंदामध्ये फळीफोड 1) महेंद्र वारिंगे,2)शिवाजी जांभूळकर,संतोष पिंगळे,

13 सेकंदामध्ये फळीफोड – 1)संदीप चव्हाण 2) वैभव दळवी
14 सेकंदामध्ये फळीफोड –1) आदित्य तांबोळी 2) राजवीर दरेकर,
15 सेकंदामध्ये फळीफोड -1) सांनी लोहकरे 2) देखण्या ग्रुप, दत्तात्रय गायकवाड या सर्वाना सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
या घाटात बैलगाडा स्पर्धा पार पाडण्यासाठी अध्यक्ष मिथुन काकडे,खजिनदार प्रणव दाभाडे,सरचिटणीस सुधीर सरोदे,प्रसिद्धी प्रमुख स्मितेश भेगडे,कार्याध्यक्ष स्वप्निल दाभाडे.उपाध्यक्ष गौरव परदेशी,सौरभ जाधव,सहखजिनदार अमर जगदाळे,रोहित करपे सह विक्रम ब. दाभाडे, बाळासाहेब भेगडे, चेतन भेगडे, सोमा भेगडे, अजिक्य सातकर आदींनी विशेष प्रयत्न (Talegaon Dabhade) केले.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.