BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade: कासारसाई धरणात बुडून दोन पर्यटकांचा मृत्यू

PST-BNR-FTR-ALL

एमपीसी न्यूज – कुसगाव जवळील कासारसाई धरणात धुलीवंदनाच्या दिवशी पर्यटनासाठी आलेल्या दोन मित्रांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. रित्त्विक संजय गिरी (वय-२१ रा.बिजलीनगर, चिंचवड,पुणे) आणि शुभम टेकचंद राहांगडाले (वय-२१,सध्या रा.वाकड, पुणे मूळ रा.गोरेगाव, ता.गोरेगाव, जि.गोंदिया, नागपूर) अशी मृतांची नावे आहेत. ते दोघेही जिवलग मित्र होते.

कासारसाई धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ते दोघे गुरुवारी दुपारी पोहण्यासाठी उतरले. मात्र, पाण्याच्या पातळीचा अंदाज न आल्याने ते दोघेही पाण्यात बुडाले. सुदुंबरे येथील एनडीआरएफ पथकाने सायंकाळी दोघांचेही मृतदेह बाहेर काढले. तळेगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉ. प्रवीण कानडे यांनी शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

  • गिरी हा कोथरूड येथील एमआयटी महाविद्यालयात इंजिनिअरिंगच्या दुसऱ्या वर्गात शिक्षण घेत होता. शुभम राहांगडाले हे हडपसर येथील एका कंपनीत कामास होते. याचा पुढील तपास तळेगाव पोलीस करीत आहेत.
.

HB_POST_END_FTR-A1
.