Talegaon Dabhade : संत सेवालाल महाराज जयंती दिवस हा शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा; बंजारा सेवा संघाची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

एमपीसी न्यूज – दरवर्षी संत सेवालाल महाराज यांची जयंती 15 फेब्रुवारी रोजी साजरी करण्यात येते. हा दिवस शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी बंजारा सेवा संघ मावळ तालुका यांच्या वतीने एका लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आली आहे.

बंजारा सेवा संघ मावळ यांनी एका निवेदनद्वारे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना १५ फेब्रुवारी हा संत सेवालाल महाराज यांचा जयंती दिवस शासकीय सुट्टी म्हणून जाहीर करावा, अशी मागणी केली आहे. मावळ तालुक्यात बंजारा समाजाची सुमारे पाच हजार लोकसंख्या असून या समाजाचे तीस वर्षांपासून मावळात वास्तव्य करत आहे. बंजारा समाजाचे आराध्यगुरू संत सेवालाल महाराजांचे मंदिर उभारण्यासाठी मावळ तालुक्यात जागा उपलब्ध करून द्यावी, असेही या निवेदनात म्हंटले आहे.

बजरंग सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष हिरा जाधव, अध्यक्ष महादेव राठोड,उपाध्यक्ष शंकर पवार, देसू राठोड,सचिव गणेश राठोड,खजिनदार रामभाऊ राठोड आदींच्या सह्या असलेल्या निवेदनाची प्रत उपमुख्यमंत्री अजित पवार, वनमंत्री संजय राठोड, आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आल्या आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.