Talegaon Dabhade: प्रभाग क्र. 8 मध्ये ‘टेंपरेचर गन’ने नागरिकांची तपासणी

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील सामाजिक कार्यकर्ते ब्रिजेेंद्र किल्लावाला,आमदार सुनील अण्णा शेळके फाऊंडेशन व प्रभाग क्र. आठमधील सर्व मंडळांच्या वतीने प्रभागातील घरोघरी जाऊन परिसराची स्वच्छता करून जंतुनाशकांची फवारणी करण्यात आली. तसेच प्रत्येक नागरिकाची ‘टेंपरेचर गन’ने तपासणी करण्यात आली. त्यानंतर कोरोनाविषयी माहिती देऊन जनजागृती करण्यात आली.

त्याप्रसंगी ब्रिजेंद्र किल्लावाला, माजी नगरसेवक सूर्यकांत काळोखे, नितीन खळदे यांच्यासोबत निवडक कार्यकर्ते उपस्थित होते. सर्व कार्यकर्त्यांनी स्वतः मास्क व सॅनीटायझर वापरून नागरिकांनाही मास्क वापरण्याचे व स्वच्छता ठेवण्याचे आवाहन केले.

तळेगाव दाभाडे येथे ‘टेंपरेचर गन’ने आरोग्य तपासणी तसेच घरोघर जाऊन जंतुनाशकाची फवारणी पहिल्यांदाच करण्यात आल्याने परिसरातील नागरिकांनी उपक्रमाचे कौतुक केले.

या उपक्रमात आमदार सुनील अण्णा शेळके फाऊंडेशन, स्वराज्य मित्र मंडळ, शिवाजी मित्र मंडळ, ओंकार मित्र मंडळ, इंद्रायणी मित्र मंडळ, वैद्य कॉलनी मित्र मंडळ, चौराई मित्र मंडळ, इन्व्हेंसिबल ग्रुप, झवेरी कॉलनी मित्र मंडळ, साक्षी फौंडेशन, साक्षी डायग्नोस्टिक,सिद्धी कॉम्युनिकेशन या संस्था व मंडळे सहभागी झाली होती.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.