Talegaon Dabhade: मावळ तालुक्यात पहिले तीनही विद्यार्थी सरस्वती विद्या मंदिरचेच…!

निरंजन मंदार थिटे हा विद्यार्थी 98. 60% गुण मिळवून शाळेत व मावळ तालुक्यात प्रथम आला आहे

एमपीसी न्यूज – यंदा मार्च 2020मध्ये  घेण्यात आलेल्या शालांत परीक्षेत सरस्वती विद्या मंदिर, तळेगांव दाभाडेचे 100 विद्यार्थी सहभागी झाले होते. शाळेचा निकाल 100% लागला असून निरंजन मंदार थिटे हा विद्यार्थी 98. 60% गुण मिळवून शाळेत व मावळ तालुक्यात प्रथम आला आहे. भूमी कृष्णा शिंदे 98. 40% गुण मिळवून शाळेत व मावळ तालुक्यात दुसरी आली तर स्फूर्ती बबन कडूसकर ही विद्यार्थिनी 97. 60%गुण मिळवून शाळेत व तालुक्यात तिसरी आली आहे. 

90%च्या वर 24 विद्यार्थ्यांना गुण असून संस्कृत याविषयामध्ये 8 विद्यार्थ्यांना 100पैकी 100गुण आहेत.

शाळेच्या या दैदिप्यमान व उज्वल यशाबद्दल मुख्याध्यापिका  रेखा परदेशी, सरस्वती संस्थेचे अध्यक्ष सुरेश झेंड, उपाध्यक्ष  दिलीप कुलकर्णी, कार्यवाह  प्रमोद देशक, अंमलबजावणी अधिकारी  अनंत भोपळे, खजिनदार सुचित्रा चौधरी, शिक्षण समिती अध्यक्ष डॉ. ज्योती चोळकर, सदस्य विश्वास देशपांडे, सुनील आगळे, श्रीमती अनुराधा तापीकर यांनी सर्व शिक्षकांचे कौतुक करून यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या!

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.