Talegaon Dabhade : पसायदान हे विश्वशांतीसाथीचे महान शांतिसूक्त – सुरेश अत्रे

एमपीसी न्यूज – पसायदान हे विश्वशांतीसाठी ज्ञानेश्वरांनी रचलेले महान शांतिसूक्त आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र साहित्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश अत्रे यांनी केले. प्रा दीपक बिचे लिखित ‘पसायदान पॉकेट बुक’च्या प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शांताराम कराळे पाटील, सामाजिक कार्यकर्ते, विष्णू खांदवे, सुचेता बिचे, नंदकुमार नागुलपिल्ले उपस्थित होते.

दीपक बिचे लिखित ‘पसायदान पॉकेट बूक’चे प्रकाशन भंडारा डोगरावर शांताराम कराळे पाटील, सुरेश अत्रे, विष्णू खांदवे व सूचेता बीचे यांच्या उपस्थितीत झाले.

  • यावेळी अत्रे पुढे म्हणाले, पसायदान हा जगणंच मंत्र आहे. चिंतनाने आणि मननाने दिलेला तारणारा मंत्र हा पसायदानांत आहे. सर्व विश्वाच्या कल्याणासाठी माउलींनी सद्गुरुकडे मागितलेले ते पसायदान होय. पसायदान ही एक जीवनप्रणाली आणि जीवनदायिनी आहे.

जीवन जगण्याचे बळ व सामर्थ्य त्यात आहे. स्वामी विवेकानंदचा मानवता धर्म हा ज्ञानेश्वरांच्या विश्वधर्मच्या पायावर उभा आहे. विश्वप्रार्थना हा महामंत्र बरोबर मानवतेचा महाजागर आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.