-MPC-TOP-MOST-BANNER-I

Talegaon Dabhade : चौराईचा डोंगर म्हणजे वनौषधींचा खजिना

पावसाळ्यात या डोंगरावरुन वाहणारे हे औषधी पाणी गावात वसलेल्या तळ्यात उतारावरून वाहत येत असते

-MPC-FIRST-TOP-BANNER-I

एमपीसी न्यूज – चौराईचा डोंगर हा गावाचा जणू पाठीराखा. खिंड ओलांडून चौराईचा डोंगर लागला की उजव्यावळणावर गाव वसलेला. पावसाळ्यात हा चौराईचा डोंगर गडद हिरवा होतो देवी चौराई गावाकडे लक्ष ठेऊन असते. असंख्य औषधी वनस्पती या डोंगरावर आहेत. ​तळेगाव येथील सुप्रसिद्ध वैद्या ज्योती मुंडर्गी यांचा विशेष लेख.

देवाघरात पंचायतन असावे असे माझे गाव आहे. गाव प्राक्रूतिक निसर्ग सौदर्य लाभलेले. गावाकडे येताना डावीकडे घोरावडेश्वराचा डोंगर लागतो. त्यावर मरजाई  देवी, महादेवाचे पांडवकालीन प्राचीन शिवमंदिर, लांबून लक्ष वेधून घेणारा बिर्लाचा गणपती, प्रतिशिर्डी, चौराइची देवी डाव्या हाताला ठेवत खिंड ओलांडली की थंड हवेची झुळुक आली की समजावे तळेगाव आले.

सरसेनापती उमाबाई दाभाडे यांचा ऐतिहासिक वारसा लाभलेले, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर यांच्या पदस्पर्शाने पूनित झालेले दोन तळी असलेले असे माझे गाव, गो.नि. दांडेकर जिथे रहात होते ते माझे सुंदर गाव आज second home destination म्हणून ओळखले जाते.

चौराईचा डोंगर हा गावाचा जणू पाठीराखा. खिंड ओलांडून चौराईचा डोंगर लागला की उजव्यावळणावर गाव वसलेला. पावसाळ्यात हा चौराईचा डोंगर गडद हिरवा होतो देवी चौराई गावाकडे लक्ष ठेऊन असते. असंख्य औषधी वनस्पती या डोंगरावर आहेत.

पावसाळ्यात या डोंगरावरुन वाहणारे हे औषधी पाणी गावात वसलेल्या तळ्यात उतारावरून वाहत येत असते त्यामुळे एके काळी संपूर्ण गावाची तहान भागावणारी ही दोन्ही ऐतिहासिक तळे हे खरे तर खूप मोठे जलस्रोत आहे त्याचा वापर गावाने परत एकदा चालू केला पाहिजे. त्यासाठी सध्या काही सामाजिक संस्था पुढे होऊन त्यांनी पुढाकार घेऊन तळ्याची स्वछता चालू केली आहे.तळ्यात साठलेला गाळ काढण्याचे काम सुरू आहे ते पूर्ण झाले तर परत एकदा हा निसर्गाचा ठेवा वापरात येईल.

चौराईचा डोंगर म्हणजे वनौषधींचा खरे तर खजिना आहे. त्यामध्ये खालील वनस्पती आढळतात

 1. करडू
 2. भारिंगी
 3. नागफणी
 4. काळी मुसळी
 5. पांढरी मुसळी
 6. रानकांदा
 7. माईनमूल
 8. शतावरी
 9. बांबू
 10. अश्वगंधा
 11. पुनर्नवा श्वेत,रक्त
 12. दगडीफुल
 13. पाषणभेद
 14. हाडंसंधी
 15. हरण खूरी
 16. अनंत
 17. कोरफड
 18. चंदन
 19. खैर
 20. पळस
 21. ताम्रशिंगी
 22. पांढराचाफा
 23. कांचनार पांढरा, लाल
 24. काटे सावर
 25. सागरगोटे ​किंवा  लताकरंज
 26. तोरण
 27. शेंदरी
 28. केळी रानकेळी
 29. नागरमोथा
 30. कर्दळी
 31. हळद
 32. रान हळद
 33. करटोली
 34. तरवड
 35. चित्रक तीन प्रकार
 36. लाजाळू
 37. गोरखमुंडी
 38. कोंबडनखी
 39. अडूळसा
 40. आघाडा
 41. कुडा
 42. देवदार
 43. बेल
 44. साग
 45. जांभूळ
 46. निर्गुडी
 47. निवडुंग
 48. भोकर
 49. एरंड
 50. आवळा
 51. भुईआवळा
 52. मोह
 53. घाणेरी
 54. तुती
 55. वड
 56. पिंपळ
 57. उंबर
 58. बला
 59. अतिबला
 60. मायाळू
 61. मधूपर्णी

कवठ, ब्राम्ही, माका, नागरमोथा गुळवेल ह्या वनस्पती तळ्याच्या काठी आढळतात. पावसाळ्यात आढळणाऱ्या रानभाज्या खरे तर आपल्या अनेक आजारांवर खूपच रामबाण असतात पहिला पाऊस पडला की पांढरा व लाल पुनर्नवा दिसयाला लागतो. ही भाजी तुमचे यकृताचे विकार लांब ठेवते, मुतखडे,नाहीसे करते सूज उतरवते, रक्तवाढीसाठी उत्तम असते तसेच त्वचारोगावर आढळणारी टाकळा, मुळव्याधीवर रामबाण ठरणारी घोळ, विपुल प्रमाणात आढळते.

-MPC-SECOND-TOP-BANNER-I

ऍटम प्लास्ट मध्ये कवठाचे खूप जुने झाड आहे व समाजमंदिराच्या ठिकाणी, चावडीचौकात, कदंब वृक्षाची मोठी झाडे आहेत.तळेगाव जनरल हॉस्पिटल मध्ये गोराखचिंचेचे मोठे झाड आवारात असून त्याच्या फळाचा गीर पित्तशामक म्हणून उत्तम काम करतो.

तळेगावचे हवामान अतिशय सुखद असते. खिंड ओलांडली की गार वाऱ्याची झुळूक मन प्रसन्न करून टाकते. ह्या अशा वनस्पतींनी समृद्ध असा हा गाव त्यामुळे लोकांच्या राहण्याचे आकर्षण ठरल्यास नवल नाही. फार पूर्वीपासून काही वैदूपरंपरा गावात अजूनही चालू आहेत तळ्याकाठी भोई समाजाची वसंत आजही आहे आजही त्यातील काही लोक ही पारंपारिक औषधे देत असतात व लोक मोठ्या संख्येने ही रामबाण औषधे घेत असतात.

त्यातील भोई समाजाच्या सुनीता परदेशी यांना मी भेटले. त्यांनी सांगितले की गेल्या चार पिढ्या आम्ही ही औषधे देतो त्याचा गुण खूप चांगला आहे. त्यांचे वडील भगीरथ रामा परदेशी व त्यांचे वडील रामा परदेशी ही औषधे देत असत. कावीळ,मुतखडा,मणक्याचे विकार,नागीण,दारू सोडणे यावर खूप रामबाण औषधे आहेत. त्यांचा गेल्या 100 पेक्षा अधिक वर्षे हाच व्यवसाय करत आहेत.

आता सुनीता परदेशी औषधे देतात. औषध देताना खूप नियम पाळावे लागतात बांगड्यांचा आवाज पण वनस्पती काढताना चालत नाही मंत्र म्हणून ही औषधे देतो असे त्यांनी सांगितले. काविळीवर एका वनस्पतीची माळ गळ्यात घातली जाते त्या वनस्पतींचा वास खूप उग्र असतो त्या उग्र वासानेच प्रभावाने कावीळ उतरते.

नागिणीवर लेप घातला जातो. पांढरी कावीळ असेल तर दह्यातून औषधे दिली जातात. ही वैदूपरंपरा खरे तर ह्या वनस्पतींची जपणूक करत असतो त्यांचे आरोग्यक्षेत्रातील दान दुर्लक्षित असल्याने ते ज्ञान खऱ्या अर्थाने समाजापर्यंत पोहचत नाही. यात पुनर्नवा,पाषाण भेद या वनस्पतींचा समावेश आहे.

मोतीबिंदू साठी रातनज्योत वनस्पतींचे थेंब घातले जातात योग्य प्रशिक्षण दिले तर हा समाज पण आपल्या परंपरा टिकवत काळजी घेऊन आरोग्यास हातभार लावेल असेच वाटते. ​हा वारसा जपला पाहिजे. नगरपालिकेजवळ एक मालिशवाला होता तो मालीश उत्तम करत असे अनेक लोकं त्याच्याकडे मानदुखी साठी जात. नगरपालिकेच्या अलीकडे ओढ्याजवळ लक्ष्मीबाग येथे नित्सुरे वैद्य होते ते आयुर्वेदिक औषधे देत असत. त्यांनी कॅन्सर चा रुग्ण बरा केला होता व त्यांच्याकडे टाटा हॉस्पिटलचे रिपोर्ट्स पण होते. त्यांचा मुलगा ,पत्नी सध्या पुण्यात आहेत ते गोपालक असून प्राण्यांच्या आजारासाठी अनेक वनस्पतिज औषधे बनवली होती.

वैद्या ज्योती नागराज मुंडर्गी
तळेगाव दाभाडे,
9881077306

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

.