Talegaon Dabhade : सलग आठ तास परिश्रमातून रांगोळीतून साकारली जिजाऊंची प्रतिमा

एमपीसी न्यूज – जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने (Talegaon Dabhade) रुपाली प्रदीप जव्हेरी यांनी सलग आठ तास मेहनत घेऊन रांगोळीतून माँसाहेब जिजाऊंची प्रतिमा साकारली. रांगोळीतून साकारलेली प्रतिमा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी गर्दी केली. रुपाली यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

या अगोदर प्रकट दिनाच्या दिवशी स्वामी समर्थ, शिवरात्रीच्या दिवशी श्री शंकर, पार्वती, डोळसनाथ उत्सवाचे दिवशी श्री डोळसनाथ महाराज यांची रांगोळी तिने वेळोवेळी काढली आहे.

Pune Crime : पुण्यात पुन्हा कोयते आले बाहेर! दहशत निर्माण करण्यासाठी चार तरुणांचा प्रताप

तीने दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर पोट्रेटचा कोर्स पूर्ण केला आहे. परिसरामध्ये शुभ कार्याच्या प्रसंगी रांगोळी काढण्यासाठी तिला बोलाविले जाते. व ती त्या घरी रांगोळी काढून त्या परिवाराचा आनंद व्दिगुणित करते. तिच्या या कामाचे सर्वत्र कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.