Talegaon Dabhade : तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने गुरुवारी व्याख्यान

एमपीसी न्यूज – तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने आद्य मराठी पत्रकार “आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांच्या 208 व्या जयंतीनिमित्त ज्येष्ठ पत्रकार भारतकुमार राऊत यांचे व्याख्यान गुरुवार (दि. 20 रोजी) सकाळी 11 वाजता आयोजित करण्यात आले आहे. हा कार्यक्रम तळेगाव दाभाडे येथील योगीराज सभागृहात होणार आहे. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी आमदार कृष्णराव भेगडे असणार आहे.

यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी राज्यमंत्री संजय(बाळा) भेगडे, आमदार सुनील शेळके, नगराध्यक्षा चित्रा  जगनाडे, उपनगराध्यक्षा वैशाली दाभाडे, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक झिंजाड आदी मान्यवर उपस्थित राहणार आहे.

आद्य मराठी पत्रकार “आचार्य बाळशास्त्री जांभेकर” यांच्या जयंती निमित्त तळेगाव शहर पत्रकार संघाच्या वतीने प्रत्येक वर्षी कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमास तळेगाव व परिसरातील नागरिक बंधू भगिनी, पत्रकार, राजकीय, सामाजिक, क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थित राहावे, असे आवाहन तळेगाव शहर पत्रकार संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे, सचिव अतुल पवार व सहका-यांनी केले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.