Talegaon Dabhade: चाकण रस्त्याचे काम रखडण्यामागील वास्तव पत्रकारांनी मांडावे- नंदकुमार शेलार

एमपीसी न्यूज- तळेगाव चाकण रस्त्याच्या दुरावस्थेबाबत पत्रकारांनी वेळोवेळी आवाज उठविला असला, तरी देखील रस्त्याचे काम का रखडले आहे. या मागील वास्तव पत्रकारांनी मांडावे. अशी अपेक्षा मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेचे संचालक नंदकुमार शेलार यांनी रविवारी ( दि 6 जानेवारी ) यावेळी व्यक्त केले.

मामासाहेब खांडगे नागरी सहकारी पतसंस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या संस्थेच्या सभागृहात पत्रकार दिनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते.तळेगाव दाभाडे परिसरातील सुनील वाळुंज, सोनबा गोपाळे (गुरूजी), रमेश जाधव (गुरूजी), मनोहर दाभाडे, प्रभाकर तुमकर आदी पत्रकारांचा सन्मान करण्यात आला.

शेलार पुढे म्हणाले की, तळेगाव फाट्यावरून चाकणला जाणा-या रस्त्यामधील रस्ता रूंदी करणामधील अडथळे नगरपरिषद प्रशासनाने पूर्णपणे दूर केले आहे. या रस्त्याला राष्ट्रीय महामार्ग म्हणून केंद्राशासनाकडून मान्यता मिळालेली आहे त्याचबरोबर रस्त्याच्या रूंदीकरणासाठी शासनाकडून आर्थिक नियोजन देखील झालेले आहे, तरी देखील रस्ता रूंदी करण का होत नाही? अशी खंत शेलार यांनी व्यक्त करून याबाबत पत्रकारांनी जातीने लक्ष घालून नागरीकांच्या हितासाठी काम करावे असे आवाहन शेलार यांनी केले.

ते पुढे म्हणाले तळेगाव चाकण रस्ता रूंदीकरण कोणत्या कारणांनी अडकलं अशी खंत…व्यक्त करून समाजामध्ये वर्षानुवर्षे अनेक प्रश्न लटकलेले आहे. त्यासाठी पत्रकाराने सोडवण्यासाठी पुढे यावे. पाणी, वीज, रस्ते, आरोग्य या मूलभूत गोष्टीशिवाय, शैक्षणिक, विकासात्मक प्रश्नांना वाचा फोडली पाहिजे. असे त्यांनी सांगितले.

गोपाळे गुरूजी म्हणाले पत्रकारितेला समाजाने, शासनाने मान्यता दिलेली आहे. पत्रकारीता कसी असावी तर सुजाण, सुबुद्ध, समाजहितैषी व चारित्र्यसंपन्न, निर्भीड, पारदर्शी व सत्य मांडणारी असावी. हाच आदर्श आणि वसा – वारसा आचार्य बाळशास्त्री जांभेकरांनी घालून दिला आहे. त्याचे पालन आम्ही पत्रकार करत आहोत.

बदलत्या काळानुसार पत्रकारितेची आवाहने आहेतच ज्ञान प्रसार, लोकजागृती, धर्मांतर आदी गोष्टींसाठी पत्रकारांने वास्तवादी राहून सामाजिक जाणीव ठेवावी. प्राप्त परिस्थितीत निर्भयपणे काम करणे गरजेचे आहे. वेगवेगळे राजकीय पक्ष, व्यक्ती, धनाढय समाजावर कब्जा मिळू पाहात आहे. त्यांच्याविरूद्ध निर्भयपणे लिहिलं पाहिजे. समाजाला बाधा आणणारे समाज कंटक आणि अन्यायाविरूद्ध लढलं पाहिजे. असेही म्हणाले.

तळेगाव पत्रकार संघाचे अध्यक्ष सुनील वाळुंज यांनी मनोगत व्यक्त केले.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गणेश खांडगे यांनी मार्गदर्शन करून पत्रकारांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी संस्थेचे सचिव विनायक कदम, संचालक अविनाश पाटील ,सुहास गरूड, राज खांडभोर, कुसुम वाळुंज, वृक्ष प्राधिकरणचे संदीप पानसरे, राकेश जव्हेरी आणि संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद आदी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राज खांडभोर यांनी केले. प्रास्ताविक अविनाश पाटील यांनी केले. आभार कुसूम वाळुंज यांनी मानले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.