Talegaon Dabhade : ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरची विद्यार्थिनी तालुक्यात तिसरी

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील ॲड. पु. वा. परांजपे विद्या मंदिरची ( Talegaon Dabhade) विद्यार्थिनी तस्मिन गुलाब पठाण ही तालुक्यात मराठी माध्यमात तिसरी आली आहे. तिला दहावीच्या परीक्षेत 95 टक्के गुण मिळाले आहेत.

तर शाळेचा निकाल 93.70 टक्के लागला आहे. शाळेत प्रथम क्रमांक तस्मिन गुलाब पठाण (95 टक्के), व्दितीय क्रमांक अलिशा राजू  मुजावर (87.40 टक्के), तृतीय क्रमांक मनीष जन्मराज कांबळे (86.20 टक्के) यांनी मिळवला आहे.

Vande Bharat Express : मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेसचे आज होणारे लोकार्पण रद्द

सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री संजय तथा बाळा भेगडे,  उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, सहसचिव शालेय समितीचे अध्यक्ष नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के,यांनी तस्मीनचे व तिला मार्गदर्शन करणारे मुख्याध्यापक पांडुरंग पोटे, पर्यवेक्षक पांडुरंग कापरे आणि सर्व विषय शिक्षकांचे विशेष ( Talegaon Dabhade) अभिनंदन केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.