_MPC_DIR_MPU_III

Talegaon Dabhade : तीर्थराज प्रॉडक्शन व स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानतर्फे अभिनय कार्यशाळा

एमपीसी न्यूज- तीर्थराज प्रॉडक्शन आणि स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यमाने अभिनय, नृत्य, नाट्य अशा विविध विषयावर मार्गदर्शन करणारी कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. दोन महिने चालणारी ही कार्यशाळा 30 मार्च रोजी सुरु होणार आहे. चला हवा येऊ द्या फेम सुप्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके या कार्यशाळेला भेट देणार आहेत.

_MPC_DIR_MPU_IV

ही कार्यशाळा सर्व वयोगटातील स्त्री पुरुष कलाकारांसाठी असून या कार्यशाळेत सिने आणि नाट्यसृष्टीतील अनुभवी आणि नावाजलेल्या कलाकारांकडून गाणी, नृत्य, अभिनय, रॅम्पवाॅक, आॅडिशन कशी द्यायची याचे परिपूर्ण मार्गदर्शन केले जाणार आहे. गायनामध्ये सुगम संगीत व नाट्यसंगीत याचे विशेष प्रशिक्षण दिले जाईल व कथ्थक, लोकनृत्य, बॉलिवूड, हाॅलिवुड, वेस्टर्न डान्स यांचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण दिले जाईल. या कार्यशाळेत सिने नाट्य अभिनेता, दिग्दर्शक, लेखक , गायक आणि हरहुन्नरी कलावंत अभिषेक अवचट आणि सुप्रसिद्ध सिनेनाट्य अभिनेत्री माधुरी जोशी -अवचट हे प्रमुख मार्गदर्शन करणार आहेत. तसेच या कार्यशाळेमध्ये सहभागी कलाकाराचे पोर्टफोलिओ देखील करुन देण्यात येतील.

_MPC_DIR_MPU_II

या कार्यशाळेला ‘चला हवा येऊ द्या’ फेम सुप्रसिद्ध अभिनेते कुशल बद्रिके हे सदिच्छा भेट देणार असून अभिनेते अंकुर वाढवे, सुप्रसिद्ध गायक अभिजित कोसंबी, मिसेस मुख्यमंत्री मालिका फेम राजु बावडेकर, तसेच सुप्रसिद्ध वाँईस ओवर आर्टिस्ट हेमंत गव्हाळे आदि मान्यवरांकडुन विशेष मार्गदर्शन केले जाणार आहे.

शनिवारी दि. 28 मार्च रोजी याचे विनामूल्य सेमिनार दुपारी साडेबारा ते 3 या वेळेत “एक्टीव 24 “फत्तेलाल बंगला, फिल्म इंस्टीट्यूट समोर, सफारीज दामले शेजारी, लाॅ कॉलेज रोड पुणे येथे होणार आहे. या कार्यशाळेत सहभाग घेण्यासाठी इच्छुकांनी  81499555528 ,  8698814170, 7718003869 या क्रमांकावर संपर्क साधावा असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.