BNR-HDR-TOP-Mobile

Talegaon Dabhade : संत तुकाराम महाराज भक्तनिवास, प्रसादालय उभारल्याने अध्यात्मिकतेला मिळाली चालना

माजी आमदार कृष्णराव भेगडे यांचे गौरवोद्गार; कार्यक्रमास मान्यवरांची उपस्थिती

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – काय सांगू आता संतांचे उपकार। मज निरंतर जागविती॥ या अभंगाच्या ओव्यांच्या उक्तिप्रमाणे भंडारा डोंगरावरती येणार्‍या सर्व भाविकांच्या सुखसोईसाठी शांताराम किसनराव कराळे पाटील यांनी उभारलेल्या श्री संत तुकाराम महाराज भक्त निवास आणि संत तुकाराम महाराज प्रसादालयाच्या उद्घाटन समारंभानिमित्त रविवारी 10 फेब्रुवारी रोजी हभप नाना महाराज तावरे, जि. वाकुळणी, प्रहार संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशचे अध्यक्ष हभप अजय महाराज बारस्कर, माजी आमदार कृष्णराव भेगडे यांच्या हस्ते उदघाटन समारंभ पार पडला.

वसंत पंचमीचे महत्त्व समजावून सांगताना कृष्णराव भेगडे म्हणाले, संत तुकाराम महाराज यांचाही जन्म याच दिवशी झालेला आहे. वसंत ऋतुच्या प्रारंभाने नवीन जीवनाची सुरुवात होते. त्याचप्रमाणे शिक्षण आणि सर्जनशीलतेची देवी सरस्वतीची पूजाही केली जाते. आपल्या संस्कृतीमध्ये सणोत्सवाला वैज्ञानिक महत्त्व आहे. तसेच कराळे पाटील यांनी हे भक्तनिवास आणि प्रसादालय उभारुन अध्यात्मिकतेला चालना मिळवून दिली आहे. हे भक्तनिवास ज्या उंचीचे बांधले आहे त्याच उंचीने याचे पावित्र्य राखणे गरजेचे आहे. भाविकांची सोयसुविधांचा लाभ व्हावा, या उदात्त हेतूने हे महान कार्य केले असल्याचे गौरवोद्गारही भेगडे यांनी यावेळी व्यक्त केले.

  • या कार्यक्रमास भंडारा डोंगर ट्रस्टचे अध्यक्ष बाळासाहेब काशीद, विश्वस्त विजय बोत्रे, विश्वस्त शंकरराव शेलार, स्वातंत्र्य सैनिक बाळासाहेब जांभूळकर, विश्वस्त निवृत्ती (पुढारी) दाभाडे, विश्वस्त रामभाऊ कराळे पाटील, विश्वस्त दत्तोबा कराळे पाटील, विश्वस्त संजू शेठ माळी, विश्वस्त बापू शेलार, विश्वस्त रविंद्र महाराज ढोरे, विश्वस्त तानाजी कराळे, विश्वस्त भिमाजी दाभाडे, सेक्रेटरी जोपाशेठ पवार आदी मान्यवरांची उपस्थिती होती.

या कार्यक्रमास आमदार बाळा भेगडे, विश्वस्त बापूसाहेब भेगडे, संदीप काकडे मावळचे उपसभापती शांताराम बापू कदम, अशोक काकडे, माधव भेगडे, सागर पवार, माजी उपसरपंच दिलीप ढोरे, प्रशांत भागवत, आशिष ढोरे, आदर्श सरपंच संदीप काशीद, गजानन कराळे पाटील, उपसरपंच नितीन ताठे, माजी उपसरपंच सुरेश गाडे, मोरेश्वर कराळे पाटील, ग्रामपंचायत सदस्य रमेश कराळे पाटील, माजी ग्रामपंचायत सदस्य संजय गाडे, गोरख गाडे, पुना सिम्सचे अधिकारी कपोतेसाहेब, बाळासाहेब निवृत्ती कराळे, बाळासाहेब सहादू कराळे, बाबाजी खेडेकर, सुखदेव कराळे, ग्रामपंचायत सदस्या सारीका वाळुंजकर, संगीता खेडेकर, स्नेहा शिंदे, सारीका अनिल घोजगे, माजी सरपंच सुमनताई कराळे, शंकर पवळे, बबलू शेलार, तुषार काळोखे, वसंत कराळे पाटील, बाळासाहेब तुकाराम कराळे पाटील, बाळासाहेब टेमगिरे यांचीही उपस्थिती लाभली.

  • पाहुण्यांचे स्वागत आणि प्रास्ताविक बाळासाहेब काशीद यांनी केले. यावेळी बोलताना ते म्हणाले की, आलेल्या भाविकांना या ठिकाणी उत्तम सोयीसुविधा मिळावी. तसेच थंडीच्या कडाक्यातही भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. हे भक्त निवास भाविकांसाठी 24 तास सेवेस तत्पर राहणार असून, कुणाचीही गैरसोय होणार नाही. हे भक्त निवास राज्यातील अग्रगण्य भक्तपीठ ठरेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.

यावेळी उपस्थितांचा आभार किसन कराळे पाटील, अजित कराळे पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हभप मनोहर पंथ ढमाले मामा यांनी केले.

HB_POST_END_FTR-A2

.