Talegaon Dabhade : आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासा- नम्रता पाटील

एमपीसी न्यूज – आयुष्यभर शिकण्याची वृत्ती जोपासा, असा मोलाचा सल्ला नम्रता पाटील यांनी विद्यार्थ्यांना दिला. डी. वाय. पाटील टेक्निकल कॅम्पस आंबी तळेगाव येथे अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांचा पदवीदान कार्यक्रम बुधवारी, (दि १३ फेब्रुवारी २०१९) उत्साहात पार पडला. याप्रसंगी नम्रता पाटील (डीसीपी झोन २ PCMC) या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी श्रीमती पाटील यांनी पदवी प्राप्त अभियंत्यांना पुढील शिक्षणासाठी मोलाचे मार्गदर्शन केले. शैक्षणिक वर्ष २०१७-१८ या वर्षात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून पदवी परीक्षा उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना श्रीमती पाटील यांच्या हस्ते पदवी प्रदान करण्यात आल्या.

  • याप्रसंगी प्राचार्य डॉ. अभय पवार, प्राचार्य डॉ. लक्ष्मण कांबळे आणि प्राचार्य डॉ. राजेश खेर्डे यांनी देखील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकीमधील संधींविषयी मार्गदर्शन केले. संस्थेचे विश्वस्त श्री बी डी कोटकर हे देखील याप्रसंगी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे परीक्षा अधिकारी डॉ. रेणू पराशर, प्रा. संतोष बारी आणि प्रा. संतोष बिरादार यांच्या प्रयत्नातून आणि नियोजनामुळे हा कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. संस्थेचे प्रशासकीय अधिकारी भवानराव गायकवाड तसेच महाविद्यालयाचे रजिस्ट्रार अशोक पाटील, राजेंद्र पाटील यांचेही मोलाचे सहकार्य लाभले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.