Talegaon Dabhade : उद्याच्या प्रगत भारतासाठी आजचे योगदान महत्त्वाचे – रामदास काकडे

एमपीसी न्यूज – उद्याच्या प्रगत भारतासाठी आपण आज केलेले योगदान महत्त्वाचे (Talegaon Dabhade) आहे. उद्याच्या उज्वल भारतासाठी प्रत्येकाने आज योगदान दिले पाहिजे. तरुणांनी कमी वयात जास्त परिश्रम घेऊन यशस्वी उद्योजक व्हावे. स्वातंत्र्य मिळवण्यासाठी ज्या थोर व्यक्तींनी बलिदान दिले आहे, त्यांचे स्मरण करून आदर्श घेतला पाहिजे, असे मत इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे यांनी व्यक्त केले.

भारतीय स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवानिमित्त इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेच्या इंद्रायणी महाविद्यालय, इंद्रायणी इन्स्टिट्यूट फार्मसी आणि इंद्रायणी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मासुटिकल एज्युकेशन अँड रिसर्च यांच्या संयुक्तपणे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्य दिनानिमित्त उद्योजक नितीन मित्तल यांच्या हस्ते ध्वजारोहन करण्यात आले. त्यानंतर संस्थेच्या वतीने तिरंगा रॅली काढण्यात आली. ध्वजारोहणाच्या कार्यक्रमावेळी काकडे बोलत होते.

यावेळी इंद्रायणी विद्या मंदिर संस्थेचे अध्यक्ष रामदास काकडे, कार्यवाह चंद्रकांत शेटे, खजिनदार शैलेश शहा, सदस्य गणेश खांडगे, संदीप काकडे, विलास काळोखे, महाविद्यालय विकास समितीचे सदस्य परेश पारेख, चंद्रभान खळदे, संजय साने, युवराज काकडे, संजय वाडेकर, इंद्रायणी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संभाजी मलघे, फार्मसी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय आरोटे, दशरथ जांभुळकर, आजी-माजी विद्यार्थी पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्राचार्य डॉ. संभाजी मलघे यांनी प्रास्ताविक केले.

नितीन मित्तल म्हणाले, की विद्यार्थ्यांनी (Talegaon Dabhade) आपल्या कृतीतून देशप्रेम जागृत ठेवले पाहिजे. तरुणांनी व्यवसायात पदार्पण करण्यापूर्वी प्रथम त्या क्षेत्रातील अनुभव प्राप्त करणे गरजेचे आहे.

Talegaon Dabhade

संस्थेच्या वतीने भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. या रॅलीमध्ये विद्यार्थ्यांनी सुमारे पंधराशे विद्यार्थी, तसेच संस्थेचे पदाधिकारी, विश्वस्त आणि प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. इंद्रायणी महाविद्यालयाच्या प्रांगणातून सुरु झालेली रॅली इंद्रायणी कॉलनी मार्गे काका हलवाई, नगरपरिषद, जिजामाता चौक, गणपती मंदिर चौक, बाजारपेठ, मारुती मंदिर चौक, बापट बंगला मार्गे, खांडगे पेट्रोल पंप, एसटी बस बसस्थानक, तळेगाव स्टेशन चौक, यशवंत नगर, शिवाजी चौक, मराठा क्रांती चौक मार्गे महाविद्यालयात रॅलीचा समारोप झाला. विद्यार्थ्यांनी स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, विचारवंत, शास्त्रज्ञ यांची वेशभूषा करून ‘भारत माता की जय’, वंदे मातरम अशा घोषणा देत राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या रॅलीचे नागरिकांनी मोठ्या उत्साहाने स्वागत केले. रॅलीच्या माध्यमातून भारतीय स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करण्यात आले.

Mulshi dam: मुळशी धरणाच्या सांडव्यातून विसर्ग वाढवून 13,200 क्यूसेक

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.