Talegaon Dabhade : कवी मनिष मोरे यांच्या ‘निराकार’ कविता संग्रहाचा उद्या प्रकाशन सोहळा

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे येथील तरूण गरीब, होतकरू उदयोन्मुख कवी मनिष रवींद्र मोरे यांच्या ‘ निराकार ‘ या कविता संग्रहाचा प्रकाशन समारंभ उद्या गुरूवारी (दि 2 जानेवारी 2020) सकाळी 12 वाजता ‘स्वरांगण’, साप्ताहिक ‘अंबर’ कार्यालय 30, भालेराव काॅलनी, तळेगाव स्टेशन येथे पार पडणार आहे,  अशी माहिती आयोजकांनी दिली.

साप्ताहिक ‘अंबर’चे संपादक ज्येष्ठ साहित्यिक व हभप ज्येष्ठ पत्रकार सुरेश साखवळकर यांच्या हस्ते प्रकाशन होत असून या समारंभप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून तळेगाव दाभाडे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किरण ओसवाल हे उपस्थित राहणार आहेत.

अवघ्या 20 वर्षाच्या कमी वयात आपल्या आवडीला कौशल्यातून साकार करणा-या उदयोन्मुख कवी मनिष मोरे यांच्या कविता संग्रहाच्या प्रकाशन समारंभास उपस्थित राहण्याचे आवाहन रवींद्र मोरे, शुभम मोरे, शरद मोरे, सिद्धांत मोरे आणि परिवाराने केले आहे. या कविता संग्रहात 200 हून अधिक कवितांचा संग्रह करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.