_MPC_DIR_MPU_III -NEW PUN  21 JUN 2021

Talegaon Dabhade: लॉकडाऊनला तळेगाव दाभाडे व्यापारी संघाचा विरोध

Talegaon Dabhade traders oppose lockdown कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी दुकाने बंद ठेवणे हा उपाय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढतील

एमपीसी न्यूज- राज्याचे उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या आदेशावरून पुणे जिल्हा प्रशासनाने पुकारलेल्या लॉकडाऊनला तळेगाव दाभाडे शहर व्यापारी संघाच्या वतीने विरोध करण्यात आला आहे. यासंदर्भात व्यापारी संघाच्या वतीने मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांना रविवारी (दि.12) निवेदन देण्यात आले.

यावेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे यांनाही निवेदन देण्यात आले आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी दुकाने बंद ठेवणे हा उपाय नसल्याचे निवेदनात म्हटले आहे. लॉकडाऊनमुळे व्यापाऱ्यांच्या आत्महत्या वाढतील, अशी भीती व्यापारी संघाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे.

_MPC_DIR_MPU_II

लॉकडाऊनच्या प्रत्येक काळात व्यापाऱ्यांनी प्रशासनास सहकार्य केले आहे. वाढत्या लॉकडाऊनमुळे व्यापारी मेटाकुटीला आले आहेत. कर्मचाऱ्यांना वेतन देणे, दुकान भाडे, घरभाडे देणे, कर्जाचे हप्ते व त्यावरील व्याज भरणे शक्य नसल्याचे निवेदनात म्हटले आहे.

पुणे, पिंपरी-चिंचवडसह आयुक्तालयाच्या अंर्तगत येणाऱ्या सर्व भागांसाठी हा लॉकडाऊन लागू केल्यास व्यापारी वर्गाची फार मोठी हानी होणार आहे. शासनाने याचा विचार करावा, अशी विनंती करण्यात आली आहे.

याप्रसंगी व्यापारी संघाचे मार्गदर्शक माजी नगरसेवक इंदरमल ओसवाल, नगरसेवक अरुण माने, व्यापारी आघाडीचे अध्यक्ष निर्मल ओसवाल, कोषाध्यक्ष सतीश राऊत, फोटोग्राफी अध्यक्ष अंकुश दाभाडे, किराणा भुसार अध्यक्ष केयुर शहा, दिलीप शहा, ललित गोरे, दिनेश शहा, वैभव कोतुळकर, पंकज गुंदेशा, हेमंत वाणी, भरत राठोड, चैतन्य कोरडे, हेमंत सोलंकी, विजय महाजन, अक्षय हेगडे आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.