Talegaon Dabhade : परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान उत्कृष्ट काम केल्याबद्दल वाहतूक शाखेच्या अधिकारी, कर्मचारी यांचा सन्मान

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे आणि परिसरामध्ये गणेशोत्सवादरम्यान बंदोबस्त, वाहतूक व्यवस्था, कायदा व सुव्यवस्था या सर्व पातळ्यांवर उत्कृष्ट काम केल्याबद्दल तळेगावकर जनतेच्या वतीने, जायंट्स गृप ऑफ तळेगाव दाभाडे यांच्या तर्फे तळेगाव दाभाडे पोलीस स्टेशन, तळेगाव एमआयडीसी, तळेगाव वाहतूक शाखा येथील वरिष्ठ पोलीस अधिकारी, हवालदार, कर्मचारी व ट्रँफिक वॉर्डन यांचा सन्मान करण्यात आला.

तळेगाव दाभाडे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे, तळेगाव एमआयडीसी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्रकुमार राजमाने, वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक किशोर यादव, यांना आभार पत्र, गौरवपत्र आणि पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. तसेच वाहतूक हवालदार रावण, हत्ते, गावडे व सर्व वाहतूक वॉर्डन यांना यथोचित सन्मानित करण्यात आले.

विसर्जन मिरवणुकीत वाहतूक व्यवस्था बंदोबस्त करण्यासाठी जायंट्स सभासदांना संधी दिल्याबद्दल अध्यक्ष आण्णाराव कोळी यांनी आभार व्यक्त केले. जायंट्सचे अध्यक्ष अण्णाराव कोळी, संस्थापक संदीप गोंदेगावे, माजी अध्यक्ष अ‍ॅड. देविदास टिळे, उपाध्यक्ष हिरामण बोत्रे, माऊली लोखंडे, खजिनदार रवींद्र कोळेकर, जनसंपर्क अधिकारी सुमित पारखे, मानद सभासद व सामाजिक कार्यकर्ते दिलीप डोळस आदी उपस्थित होते.

‘जागरूक वाचक कट्टा’चे सदस्य सुरेश शिंदे, प्रमोद देशक, किरण ओसवाल, दैनिक सकाळचे पत्रकार गणेश बोरुडे आदी उपस्थित होते. देशक यांनी पेढे वाटून सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्याप्रती आभार व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.