Talegaon Dabhade : शिवाजी महाराज चौक ते कातवी मार्गावरील अवजड वाहतूक बंद

एमपीसी न्यूज – तळेगाव स्टेशन येथील शिवाजी महाराज चौकातून कातवी फाट्याकडे जाणा-या मार्गावरील अवजड वाहतूक प्रायोगिक तत्वावर बंद करण्यात आली आहे. यासाठी पर्यायी मार्ग देण्यात आला आहे. आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पूल पडल्याने परिसरात वाहतूक कोंडी होत असल्याने कोंडी टाळण्यासाठी हा बदल करण्यात आला आहे.

आंबी येथील इंद्रायणी नदीवरील पूल 16 डिसेंबर 2019 रोजी पडला. त्यामुळे आंबी गावाकडे जाणा-या वाहतुकीची कोंडी होत आहे. या भागात मोठ्या प्रमाणात एमआयडीसी असल्याने कंपन्यांची अवजड वाहतूक शिवाजी महाराज चौक, तळेगावकडून कातवी मार्गे जाते. शिवाजी महाराज चौकातून कातवीकडे जाणारा रस्ता साधारण तीन मीटर रुंदीचा आहे. या रस्त्यावरून एका वेळी एकच वाहन जाऊ शकते. याच रस्त्यावर रहिवासी वस्त्या आणि शाळा आहेत. या मार्गावरील अवजड वाहतुकीमुळे अपघात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मार्गावरील अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

चाकणकडून सिंडिकेट चौक, शिवाजी महाराज चौक मार्गे कातवी फाट्याकडे जाणा-या सहा टायर आणि त्यावरील अवजड वाहनांना शिवाजी चौकातून पुढे जाता येणार नाही. त्यासाठी पर्यायी मार्ग म्हणून चाकण, तळेगाव, वडगाव फाटा, वडगाव मार्गे एमआयडीसी हा मार्ग वापरता येणार आहे.

एमआयडीसी हद्दीतून कातवी फाटा मार्गे शिवाजी महाराज चौक, सिंडिकेट चौकाकडे जाणा-या सहा चाकी व त्यापुढील अवजड वाहनांना कातवी फाट्यापासून पुढे जाण्यास बंदी आहे. या मार्गावरील वाहने तळेगाव मार्गे इच्छित स्थळी जातील.

वरील बदल प्रायोगिक तत्वावर करण्यात आला आहे. याबाबत नागरिकांच्या सूचना असल्यास त्या सूचना लेखी स्वरूपात 17 ते 31 मार्च 2020 या कालावधीत पिंपरी-चिंचवड वाहतूक शाखेत देण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या बदलातून अग्निशमन, पोलीस वाहने, रुग्णवाहिका आदी वाहनांना वगळण्यात आले आहे. नागरिकांच्या हरकती आणि सूचनांचा विचार करून अंतिम आदेश काढण्यात येणार असल्याचे वाहतूक विभागाचे उपायुक्त सुधीर हिरेमठ यांनी सांगितले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.