Talegaon Dabhade: स्काऊट-गाईड जागतिक स्कार्फ डे निमित्ताने वृक्षारोपण

Talegaon Dabhade: Tree planting on the occasion of Scout-Guide World Scarf Day याअंतर्गत पिंपळवृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच परिसरातील बालकांना खाऊ व चॉकलेट वाटून आनंद साजरा करण्यात आला.

एमपीसी न्यूज- स्काऊट-गाईड जागतिक स्कार्फ डे, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती, लोकमान्य टिळक स्मृतीदिन आणि बकरी ईद या उत्सवांचे औचित्य साधून सहाय्यक जिल्हा आयुक्त (स्काऊट) विजयकुमार जोरी यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी (दि.१) रोजी हरणेश्वर टेकडी तळेगाव स्टेशन येथे तळेगाव दाभाडे येथील स्काऊट-गाईड शिक्षक समुहातर्फे वृक्षारोपण करण्यात आले.

याअंतर्गत पिंपळवृक्षांचे रोपण करण्यात आले. तसेच परिसरातील बालकांना खाऊ व चॉकलेट वाटून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी विजय जाधव, किसन गवारी, संदीप कुंजीर, सुनील खंडाळे आदी स्काऊट शिक्षक तसेच विद्यार्थी स्कार्फ परिधान करुन उपस्थित होते. इंद्रायणी इंग्लिश स्कूलचे विशाल मोरे यांनी कार्यक्रमाचे संचालन व नेतृत्व केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.