Talegaon Dabhade : शहर पत्रकार संघाच्या सभेत खांडगे, डाॅ निकम, परदेशी यांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाची (Talegaon Dabhade) मासिक सभा पार पडली. या सभेत नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे माजी अध्यक्ष वसंतराव(दादा) खांडगे, तळेगाव जनरल हॉस्पिटलचे माजी अध्यक्ष डॉ. अशोक निकम व शहरातील युवा पत्रकार गोपाळ परदेशी यांना श्रद्धांजली वाहिली. गोपाळ परदेशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला. सभेच्या अध्यक्षस्थानी संघाचे अध्यक्ष मनोहर दाभाडे होते.

तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाची मासिक सभा साप्ताहिक अंबरच्या कार्यालयात (दि 13) रोजी संपन्न झाली. यावेळी संघाचे संस्थापक सुरेश साखवळकर, सचिव सोनबा गोपाळे, खजिनदार बी.एम.भसे, सदस्य सुनील वाळुंज, अतुल पवार, गणेश बोरुडे, राजेश बारणे, प्रभाकर तुमकर आदी उपस्थित होते.

यावेळी मासिक सभेतील विषयांचे वाचन सचिव गोपाळे यांनी केले. त्या सर्व विषयांवर सर्वांनी साधक बाधक चर्चा करून एकमताने मंजुरी दिली.

आयत्या वेळच्या विषयांमध्ये स्वर्गीय मान्यवरांना श्रद्धांजली समर्पित करण्यात आली व पत्रकार मित्र कै. गोपाळ परदेशी यांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याचा ठराव संमत करून धनादेश प्रदान करण्यासाठी उपस्थित सर्व पत्रकार परदेशी यांचे निवासस्थानी (Talegaon Dabhade) गेले. त्यावेळी कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करून धनादेश स्वाधीन करण्यात आला.

Mahavitaran : बांधकाम व्यावसायिकाला नवीन मीटर जोडणीसाठी लाच मागणाऱ्या महावितरण कर्मचाऱ्यावर गुन्हा

सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत कार्य करणारा पत्रकार संघ अशी ओळख असलेल्या तळेगाव दाभाडे शहर पत्रकार संघाच्या माध्यमातून याअगोदर कोरोना काळात नगर परिषदेस मदत,भाजप व कै. किशोरभाऊ आवरे यांनी सुरू केलेले भोजन थाळीस आर्थिक मदत, पत्रकार संघ तसेच इतर पत्रकार मित्रांना अपघातामध्ये तसेच अडचणीत मदत केली आहे. पत्रकार संघाकडून सदैव सामाजिक भान जपले जात असल्याचे मत अध्यक्ष मनोहर दाभाडे सचिव सोनबा गोपाळे यांनी व्यक्त केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.