Talegaon Dabhade : वारंगवाडी येथे शहीद जवानांना श्रद्धांजली

एमपीसी न्यूज – पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्यात शहीद झालेल्या जवानांना कँडल लावुन मोठ्या संख्येने युवकांनी संपूर्ण गावात फेरी काढली. या पाकिस्तान मु्र्दाबाद, शहीद जवान अमर रहें ‘ अशा घोषणा दिल्या व तीव्र शब्दांत निषेध व्यक्त केला.  शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

विक्रम कलावडे म्हणाले की, जो पाकिस्तानी अतिरेक्यांनी भ्याड हल्ला केला त्याला आमचे जवान चोख उत्तर दिल्याशिवाय गप्प राहणार नाही. आम्ही सर्व भारतवासी आमच्या जवानांच्या पाठीशी खंबीरपणाने उभे आहोत.

यावेळी भैरवनाथ सो. सा. संचालक श्री महेंन्द्रशेठ वारिंगे, संजय वारिंगे, अध्यक्ष आंदर मावळ रा. यु. कॉ. विक्रम कलावडे, दत्तात्रेय वारिंगे, दत्तात्रेय मांडेकर, किशोर मोरे, महादेव मोरे, रामनाथ धुमाळ, विनायक खोंडगे, ऋषीकेश वारिंगे,  ग्रामस्थ आदी उपस्थित होते.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.