Talegaon Dabhade : युवा कलाकारांच्या सुंदर अविष्कारांनी सजली त्रिपुर संध्या

एमपीसी न्यूज – यशवंत नगर तपोधामच्या(Talegaon Dabhade) युवा कलाकारांनी सादर केलेल्या सुंदर अविष्कारांनी त्रिपुर संध्या सजली. उपस्थित रसिकांनी प्रत्येक आविष्काराला भरभरून प्रतिसाद दिला.

मागील वर्षापासून यशवंतनगर, तपोधाम परिसरातील (Talegaon Dabhade)कलाकारांचा दीपावली निमित्त होणारा कार्यक्रम दिवाळी पहाट ऐवजी संध्याकाळी दीपावली सांज या नवीन संकल्पनेतून सादर होत आहे. यावर्षी पावसाच्या शक्यतेमुळे ‘दीपावली सांज’ या कार्यक्रमाच्या ऐवजी ‘त्रिपुर संध्या’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. माजी नगरसेवक निखिल भगत यांच्या आणि तळेगाव नागरिक मंच व यशवंत प्रतिष्ठानच्या सहकार्याने हा कार्यक्रम घेण्यात आला. इथे कुणाची भाषणे नाहीत की कुणाचा सत्कार नाही, इथे कलाकारांचा सत्कार रसिक करतात तो पण पसंतीच्या टाळ्यांनी…

जेष्ठ मान्यवरांच्या हस्ते दिपप्रज्वलाने व तळेगावातील(Talegaon Dabhade) लोकप्रिय सामाजिक कार्यकर्ते कै. किशोरभाऊ आवारे व 26 नोव्हेंबरच्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्पा हुतात्मांना आदरांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली. पंचतुंड नररुंड मालधर… या संगीत शाकुंतल नाटकातील नांदीने मैफिल रंगायला सुरुवात झाली.दिवा पाहुनी लक्ष्मी येते.(कविता ठाकूर), तू बुद्धी दे तू तेज दे (स्वरदा रामतीर्थकर), गगन सदन तेजोमय चित्रपट उंबरठा.. (स्वरदा रामतीर्थकर), ये जवळी घे… प्रिय सखया भगवंता(डॉ. प्राची पांडे), वादळांचा वेग घेउनी चांदणे मी प्यायले(धनश्री शिंदे), बहरला मधुमास हा( सम्राट काशीकर, डॉ. प्राची पांडे), अश्या एका पेक्षा एक सुंदर गीतांच्या सादरीकरणाने कार्यक्रमाची रंगत वाढत असतानाच पावसाने पण आपली हजेरी लावली 15 मिनिटे बरसल्यावर पाऊस थांबला आणि नंतर कार्यक्रम परत सुरु झाला.

त्यांनतर झालेल्या चला जेजुरीला जाऊ (भाग्यश्री लोहार), ग…साजणी व छबीदार छबी या पिंजरा चित्रपटातील गाण्यांनी रसिकांना ठेका धरायला लावला.. (सम्राट व धनश्री शिंदे), लख्ख पडला प्रकाश(सम्राट काशीकर), व मराठी पाऊल पडते पुढे ..या जोशपूर्ण गाण्यांनी मैफिलीची रंगत इतकी वाढली की पाऊस ही पडायचा थांबला.. विनायक वाकचौरे यांच्या ढोलकीने रसिकांची मने जिंकली. खेळ मांडियला( डॉ. प्राची व धनश्री) या अभंगाने कार्यक्रमाची सांगता झाली.

एल.ई.डी स्क्रीनवरचा डीजीटल डिस्प्ले कार्यक्रमाची उंची वाढविणारा होता सम्राट काशीकर,राजेश झिरपे सिंथ, प्रदीप जोशी संवादिनी, अनिरुद्ध जोशी, विनय कशेळकर, दीपक आपटे तबला व ताल वाद्य आणि विनायक वाकचौरे यांची दमदार ढोलकी यांनी या मैफिलीला तितकीच सुरेल साथ दिली. राजीव कुमठेकर यांचे अभ्यास पुर्ण सुत्रसंचालन लक्ष वेधून घेणारे होते. कार्यक्रमाचे संगीत संयोजन प्रदीप जोशी व विनय कशेळकर यांनी केले. उत्कृष्ट छानी संयोजन (केदार अभ्यंकर), सुंदर सजावट व मंडप व्यवस्था शामराव मोहिते, छायाचित्रण सत्यम पाबळकर यांचे होते.

या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्ते, मा.नगराध्यक्ष उमाकांत कुलकर्णी, माजी नगराध्यक्ष रविद्र दाभाडे, केशवराव दाभाडे,सरस्वती शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष दिलीप कुलकर्णी, मा.नगरसेविका कल्पना भोपळे, डॉ.अनंत परांजपे (विश्वस्त कलापिनी), नागरिक संघाचे अध्यक्ष वसंत भापकर,अनिकेत दाभाडे, आशा दाभाडे आदी मान्यवर उपस्थित होते.

या कार्यक्रमाची संकल्पना व संयोजन निखिल भगत आणि विश्वास देशपांडे यांचे होते. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी निरंजन जहागीरदार,संविद पाटील,निलेश जाचक,सचिन कहडणे,धीरज सावंत, मिलिंद देशपांडे, गौरव भगत, श्रेया राजपूत यांनी विशेष परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे प्रायोजक माजी नगरसेवक निखिल भगत होते.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.