Talegaon Dabhade : अज्ञात व्यक्तीने पेटवला गोठा व गुरांचा चारा ; दोन जनावरे होरपळली

एमपीसी न्यूज- तळेगाव एमआयडीसी हद्दीतील कातवी (ता. मावळ) गावातील जनावरांचा गोठा व गुरांसाठी असलेला चारा अज्ञात व्यक्तीकडून पेटविण्यात आला. ही घटना शनिवारी (दि 15) रात्री घडली.

याप्रकरणी हभप बाळकृष्ण भीमराव चव्हाण व प्रवीण भीमराव चव्हाण (दोघेही कातवी मावळ येथील) यांनी तळेगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. चव्हाण यांचा गोठा व त्या शेजारी रचलेल्या गवताच्या गंजींला शनिवारी (दि 15) रात्री अज्ञात व्यक्तींनी आग लावली.

आगीची माहिती मिळताच चव्हाण बंधूनी घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा आटोकाट प्रयत्न केला. त्वरित अग्निशमन दलाला प्राचारण करून तीन गाड्यांच्या मदतीने आग विझवण्यात आली. या आगीत चव्हाण बंधूंच्या गोठ्यातील बांधलेली जनावरे भाजली गेली असुन तसेच गाई, म्हशींचा चारा व भाताचे पावळया असे अंदाजे 1 लाख 12 हजार 500 ते 1 लाख 50 हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.