Talegaon Dabhade: तळेगावमधील बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेले दोघे पॉझिटिव्ह

Talegaon Dabhade: Two positive people who came in contact with infected patients in Talegaon आता मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे.

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे येथील राव कॉलनी परिसरात शनिवारी एक 48 वर्षीय शासकीय आरोग्य कर्मचारी कोरोनाबाधित आढळला होता. या कोरोना योद्ध्यांच्या निकटच्या संपर्कातील दोन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती तहसीलदार मधुसूदन बर्गे व तालुका आरोग्याधिकारी डॉ. चंद्रकांत लोहारे यांनी दिली. त्यामुळे आता मावळातील सक्रिय कोरोना रुग्णांची संख्या 23 वर जाऊन पोहोचली आहे.

हा कर्मचारी व पत्नी, मुलगी तळेगावच्या राव कॉलनी भागातील रहिवासी आहे. या कर्मचाऱ्याच्या कुटुंबातील त्याची पत्नी व मुलगी या दोघींचे तळेगाव येथील राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान केंद्रात संस्थात्मक विलगीकरण करण्यात आले होते.

तळेगावातील राव कॉलनी भागातील राहणारी आंबवणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात काम करणारी एक 48 वर्षीय व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्याने त्यांची पत्नी (वय 44), मुलगी (वय 15) यांच्या स्वॅबचे नमुने काल तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. दोघांचेही रिपोर्ट आज पॉझिटिव्ह आले आहेत.

तळेगाव दाभाडे नगरपरिषद हद्दीतील आज अखेर 09 पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या झाली आहे. त्यापैकी यातील दोघेजण कोरोना मुक्त झाले असून आता सक्रिय रूग्णांची संख्या 7 आहे.

आनंद नगरमधील एकाच कुटुंबातील 4 तर राव कॉलनीतील एकाच कुटुंबातील 3 आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी दीपक झिंजाड यांनी सांगितली.

मावळ तालुक्यात आतापर्यंत एकूण 40 जणांना कोरोनाची लागण झाली. त्यापैकी 17 जणांनी कोरोनावर मात केली असून आता मावळ तालुक्यात 23 सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.