Talegaon Dabhade : घरासमोर घाण टाकल्यावरून दोन महिलांमध्ये हाणामारी

एमपीसी न्यूज – घरासमोर घाण टाकल्याच्या कारणावरून दोन महिलांमध्ये तुंबळ हाणामारी झाली. ही घटना मंगळवारी (दि. 30) सकाळी नऊच्या सुमारास यशवंतनगर तळेगाव स्टेशन येथे घडली.

कावेरी नामदेवराव साळुंखे (वय 38, रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन) यांनी याप्रकरणी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार ललिता सुरेश शिवनेरकर (रा. यशवंतनगर, तळेगाव स्टेशन) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ललिता या महिलेने कावेरी यांच्या घरासमोर घाण टाकली. या कारणावरून कावेरी आणि ललिता यांच्यामध्ये भांडण झाले. यामध्ये दोघींनी एकमेकींना शिवीगाळ करत हाताने मारहाण केली. ललिताने मोठमोठ्याने आरडाओरडा करत कावेरी यांच्या हाताच्या बोटाचा चावा घेऊन दुखापत केली. तसेच गळ्याला आणि तोंडावर ओरबडून जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून तळेगाव दाभाडे पोलिस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.