Talegaon Dabhade : सतर्क युवकांमुळे वाचले पाण्यात बुडणाऱ्या मुलीचे प्राण

एमपीसी न्यूज- तळेगाव दाभाडे शहरात ठिकठिकाणी खोदलेले खड्डे, उघड्या गटारी आता नागरिकांसाठी धोकादायक ठरत असून रविवारी (दि 9) सकाळी भेगडे तालीम रस्त्यावर खोदलेल्या व पाणी साठलेल्या खड्यात पडून एक लहान मुलगी खेळताना पडली. सुदैवाने त्या ठिकाणाहून जात असलेले रोट्रॅक्ट क्लबचे केशव मोहोळ आणि आकाश गाडेपाटील या तरुणाच्या सतर्कतेमुळे या मुलीचे प्राण वाचले.

_MPC_DIR_MPU_II

रविवारी (दि 9) सायकल डे झाल्यावर रोट्रॅक्ट क्लबचे केशव मोहोळ आणि आकाश गाडेपाटील हे दोघेजण भेगडे तालीमपासून पुढे निघाले होते. त्याचवेळी एक लहान मुलगी खेळत असताना रस्त्याच्या कडेला खोदलेल्या व पाणी भरलेल्या खड्यात पडली. ते पाहताच दोघांनी खड्ड्याच्या दिशेने धाव घेत या मुलीला पाण्याबाहेर काढले. त्यानंतर तिला तिच्या आईकडे सोपवले.

या खड्ड्याच्या भोवताली कोणत्याही प्रकारची सुरक्षा व्यवस्था, किंवा धोक्याचा बोर्ड देखील लावलेला नसल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे हे खड्डे नागरिकांसाठी धोकादायक ठरत आहेत. यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.