Talegaon Dabhade : यशस्वी उद्योजक होण्यासाठी ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग करावा – अनंत जलोन्हा

एमपीसी न्यूज – व्यवसाय प्रशिक्षणातून मिळालेल्या ज्ञानाचा आणि कौशल्याचा उपयोग योग्य केल्यास यशस्वी उद्योजक होता येईल, असे प्रतिपादन पुणे विभागाचे कॅनरा बँकेचे सहाय्यक महाप्रबंधक अनंत जलोन्हा यांनी केले.

वराळे येथील रुडसेट संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या फोटोग्राफी आणि व्हिडीओ शुटींग प्रशिक्षणाच्या प्रमाणपत्र वाटपाच्या कार्यक्रमात जलोन्हा हे बोलत होते.

  • यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कॅनरा बँकेचे वरिष्ठ अधिकारी वाकचौरे,रुडसेट संस्थेचे संचालक जयंत घोंगडे,प्रेस फोटोग्राफार रमेश जाधव, ज्येष्ठ पत्रकार सोनाबा गोपाळे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती मनोहर दाभाडे, प्रशिक्षक संदीप पाटील सह आदि मान्यवर उपस्थित होते.

व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर कष्ट करण्याची तयारी ठेवली पाहिजे. यासाठी योग्य नियोजन केले पाहिजे, असे अनंत जलोन्हा यांनी आपल्या भाषणात सांगितले. तर यावेळी मनोज टंकसाळे,सागर ढोले या विद्यार्थ्यांनी मनोगत व्यक्त केले.तसेच मान्यवरांनी मनोगतामधून शुभेच्छा दिल्या.

  • स्वागत प्रस्ताविक संदीप पाटील यांनी केले. सूत्रसंचालन कानिफनाथ बन यांनी केले.आभार जयंत घोंगडे यांनी केले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.