Talegaon Dabhade : पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी वैशाली प्रमोद दाभाडे

एमपीसी न्यूज- पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरचिटणीसपदी येथील तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या नगरसेविका वैशाली प्रमोद दाभाडे यांची निवड करण्यात आली आहे.

पुणे जिल्हा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षा वैशाली नागवडे यांनी त्यांना निवडीचे पत्र दिले. एक आक्रमक व अभ्यासू व्यक्तिमत्व आणि पक्षाशी असलेली बांधिलकी व राजकीय क्षेत्रातील कार्याचा विचार करून ही नियुक्ती करण्यात आल्याचे पत्रात म्हटले आहे. तळेगाव नगरपरिषदेतील आक्रमक, अभ्यासू नगरसेविका म्हणून वैशाली दाभाडे यांची ओळख आहे. महिलावर्गामध्ये त्यांचा जनसंपर्क दांडगा असून उत्कृष्ट प्रशासक व संघटक म्हणून त्या ओळखल्या जातात.

सामाजिक समतेचे व महिला सक्षमीकरणाचे विचार समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत पोहचविण्यासाठी तसेच महिला संघटन मजबूत करण्यासाठी अधिकाधिक वेळ देऊन काम करणार असल्याचे निवडीनंतर दाभाडे यांनी सांगितले. त्यांच्या निवडीबद्दल कौतुक होत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.